Horoscope Today: 'या' राशींच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस अत्यंत खास

'या' राशींच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस अत्यंत खास, कोणती आहे तुमची रास?   

Updated: Sep 23, 2022, 07:35 AM IST
Horoscope Today: 'या' राशींच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस अत्यंत खास title=

मेष : नवं घर विक्री करण्याचे योग आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहिल.  आजच्या दिवशी व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा. नवीन कामामध्ये तुम्हाला फायदा होणार आहे.

वृषभ : परदेशात जाण्याचे योग आहेत. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष द्या. आजच्या दिवशी व्यवसायात गुंतवणुकीतून फायदा होईल. तसंच नात्यामध्ये सावधगिरी बाळगा. कोणाशीही भांडण करू नका.

मिथुन : मनातील चिंता दूर होईल. या राशीच्या व्यक्तींना ज्येष्ठांचे आशीर्वाद मिळतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. घराच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या.

कर्क : कोणताही निर्णय घेताना कुटुंबाता सल्ला घ्या. घरातील वाद नष्ट होतील. नोकरीत कोणताही बदल करू नका किंवा तसा विचारंही करू नका. आजच्या दिवशी गाडी जपून चालवा. उधार दिलेले पैसे परत मिळतील.

सिंह : उधार दिलेले पैसे परत मिळतील. आजच्या दिवशी संध्याकाळपर्यंत चांगली माहिती मिळेल. आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टी सांभाळून ठेवा. मित्रांचं आजच्या दिवशी सहकार्य मिळेल.

कन्या :  मोठ्यांचा आशीर्वाद घ्या. आजच्या दिवशी दुपारपर्यंत तुमचे काम पूर्ण करा. अचानक होणारी इजा टळेल. तुमच्या जोडीदाराचा आदर करा.

तूळ : आजच्या दिवशी नवीन वाहन खरेदी करण्याची संधी आहे. मुलांबाबतची चिंता मिटणार आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

वृश्चिक : परदेश प्रवासाची संधी मिळणार आहे. तसंच नोकरीत यश मिळेल. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा.

धनु : मनाची चिंता संपेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. आर्थिक खर्च पूर्वीपेक्षा वाढेल.

मकर : घरातील कलह संपुष्टात येईल. कुटुंबाचा सल्ला घ्या. पत्नीचा आदर करा.

कुंभ  : उधार घेतलेले पैसे परत मिळतील. व्यावसायिक समस्या कमी होतील. जोडीदाराची तब्येत बिघडेल.

मीन : ज्येष्ठांच्या चरणांना स्पर्श करा. वाहन खरेदीचा योग आहे. नात्यात गोडवा येईल.