Horoscope October 31, 2021: रविवार 5 राशींना मिळणार खुशखबर, कसा असेल रविवारचा दिवस?

रविवारचा दिवस 5 राशींसाठी चांगला जाणार आहे. तुमचे बोलण्याचे कौशल्य तुम्हाला खूप फायदा मिळवून देणार 

Updated: Oct 30, 2021, 10:58 PM IST
Horoscope October 31, 2021: रविवार 5 राशींना मिळणार खुशखबर, कसा असेल रविवारचा दिवस? title=

मुंबई: रविवारचा दिवस 5 राशींसाठी चांगला जाणार आहे. तुमचे बोलण्याचे कौशल्य तुम्हाला खूप फायदा मिळवून देणार आहे. मकर राशीच्या लोकांना त्यांच्या सासरच्या लोकांकडून चांगली बातमी मिळू शकते. खगोल गुरू बेजान दारूवाला यांचा मुलगा चिराग दारूवाला यांच्याकडून रविवार 12 राशींसाठी कसा असेल ते जाणून घ्या. 

मेष: तुमचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला असेल. परिश्रमाशिवाय काहीच शक्य नाही. खर्च जपून करणं गरजेचं आहे. वाहान चालवताना काळजी घ्या. 

वृषभ: तुम्ही उत्साहाने भरलेले दिसाल. भाग्य तुमच्या सोबत राहील. कामात उत्साह राहील. 

मिथुन: भाग्य साथ देईल कामाच्या ठिकाणी चांगली प्रगती कराल. यश मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील.

कर्क: नशीबाची साथ मिळेल. तुमची कामगिरी चांगली राहील. मेहनतीनं यश मिळेल. 

सिंह : आपला दिवस चांगला राहील. आपल्या बोलाणून इतरांनाचे लक्ष वेधून घ्याल हुशारीतून आपलं काम यशस्वी कराल. 

कन्या : तुमचा दिवस छान जाईल. कामाच्या ठिकाणी तुमचं  कौतुक होईल. अनेक छोटी गुंतवणूक भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकते. 

तुळ : तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली होणार. कामासाठी चांगला जाणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात मोठा बदल होऊ शकतो.

वृश्चिक : तुमचे मन प्रसन्न राहील. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. प्रवासाचा आनंद मिळेल. व्यवसायात चांगला फायदा होईल. हातात घेतलेलं काम यशस्वीपणे पूर्ण कराल. 

धनु : कासवाच्या गतीनं प्रगती होईल. व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांनी मोठी गुंतवणूक टाळावी. 

मकर: तुमचे आरोग्य सुधारेल. बहुतेक काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. व्यावसायिक लोकांसाठी काळ कठीण असू शकतो, परंतु निराश होऊ नका. चांगली बातमी मिळू शकते. 

कुंभ: तुमच्या बोलण्याने लोक प्रभावित होतील. तुमच्या मनानुसार आज गोष्टी होतील. दिलेलं प्रॉमिस पूर्ण करण्यावर भर द्या. 

मीन: तुमच्या इच्छा इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नका. प्रशासनाशी संबंधित कामे सुरळीत पार पडतील.