Weekly Horoscope: 4 राशीच्या लोकांवर पुढच्या आठवड्यात राहणार लक्ष्मीची कृपा

नोव्हेंबरचा पहिला आठवडा 4 राशींसाठी शुभ असणार 

Updated: Oct 30, 2021, 08:38 PM IST
Weekly Horoscope: 4 राशीच्या लोकांवर पुढच्या आठवड्यात राहणार लक्ष्मीची कृपा title=

मुंबई: नोव्हेंबरचा पहिला आठवडा 4 राशींसाठी शुभ असणार आहे. दिवाळीच्या या आठवड्यात 4 राशींवर लक्ष्मीची कृपा राहणार आहे. त्याच वेळी, काही लोकांना या काळात खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. अन्यथा महिन्याच्या शेवटी त्रास होऊ शकतो. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांसाठी 1 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर 2021 हा कालावधी कसा असेल हे खगोल गुरू बेजन दारूवाला यांचा मुलगा खगोल मित्र चिराग दारूवाला यांच्याकडून जाणून घेऊया.

मेष: गणेश सांगतात की हा आठवडा शुभ आहे. कामात प्रगती होण्याची शक्यता आहे. जे लोक लेखन, साहित्य या क्षेत्रात जे लोक काम करतात त्यांच्यासाठी दिवस खास आहे. प्रयत्न करतात. या आठवड्यात काही जुनी रखडलेली कामे पूर्ण झाल्यामुळे मनात आनंद राहील.

वृषभ: या आठवड्यात तुमच्या वाणीच्या जोरावर चांगली कमाई करू शकाल. कुटुंबात तुमचा ताळमेळ चांगला राहील. जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळेल, परंतु नवीन गुंतवणूक करणे टाळावे. 

मिथुन: हा आठवडा शुभ असेल असे गणेश सांगतात. कुटुंबातील संबंध चांगले राहतील. विद्यार्थ्यांना करिअरवर लक्ष केंद्रित करावे लागेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तीच्या सध्याच्या कामात बदल होण्याची शक्यता आहे. 

कर्क: या सप्ताहात आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे गणेश सांगतात. या आठवड्यात बौद्धिक कार्यात यश मिळेल. व्यापाऱ्यांशी नवीन करार होईल. व्यावसायिकांना कामात विशेष लक्ष द्यावे लागेल.

सिंह: गणेश सांगतात की या आठवड्यात कामाच्या ठिकाणी आव्हाने वाढणार आहेत. तुम्ही व्यवसाय किंवा नोकरी करत असाल. तुमच्यासाठी संकटाचा काळ असणार आहे. तुम्ही तुमच्या विश्वासू लोकांसोबत काम केल्यास संकटावर मात कराल. या आठवड्यात अनावश्यक पैसे खर्च करणे टाळा. जोडीदाराचे सहकार्य मिळेल.

कन्या: आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. भविष्यासाठी तपशीलवार योजना बनवावी.

तुळ: पैशांची बचत करावी लागणार आहे. व्यवसायिकांनी कामाच्या विस्तारासाठी योजना तयार करणे आवश्यक आहे आणि नोकरदार लोकांना आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता कमी आहे.

वृश्चिक: या आठवड्यात कौटुंबिक गरजांवर खर्च अधिक होईल असे गणेश सांगतात. व्यापारी वर्गासाठी दिवस चांगला आहे. भ्रमात राहून कोणतेही काम करू नका. आरोग्याच्या समस्या समोर येऊ शकतात.

धनु: हा आठवडा तुम्हाला आनंदात जाणार आहे. व्यावसायावर लक्ष केंद्रीत करा. आई-वडिलांची काळजी घ्या. 

मकर: हा आठवडा सावधपणे घालवण्याची आवश्यकता आहे. कोणाशी वाद होऊ शकतो. तुम्ही घेतलेले सर्व निर्णय तुमच्यावर उलटू शकतात. त्यामुळे तुम्ही जे काही कराल ते काळजीपूर्वक करा. आर्थिक व्यवहार करताना सावध राहा. 

कुंभ: प्रेमसंबंधांमध्ये नकारात्मकतेचे वर्चस्व होऊ देऊ नका. बोलण्यावर संयम ठेवा नाहीतर प्रेमसंबंध तुटू शकतात. वैवाहिक, वैवाहिक जीवन सुखकर राहील. हृदयरोगी, मधुमेही रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी.

मीन: या आठवड्यात कामाच्या ठिकाणी यश मिळवाल असे गणेश सांगतात. शैक्षणिक क्षेत्रात नवीन संधी मिळतील. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या.