मेष - जुन्या गोष्टींपासून लांब जाण्याचा प्रयत्न करा. काही गोष्टींसाठी स्वत:ला दोषी ठरवू नका. तुमच्या आवडीच्या लोकांशी बोलू शकता. दिवस सामान्य आहे.
वृषभ - जवळच्या लोकांबाबत चांगली बातमी मिळेल. दिवस आनंदात जाईल. जबाबदारी वाढू शकते. तब्येतीकडे लक्ष देण्याची गरज आहे.
मिथुन - आत्मविश्वास ठेवा. कोणत्याही कामाचा ताण घेऊ नका. अडचणींची कामं पूर्ण कराल. कोणाच्याही विरोधात जाऊ नका. काही कामं इच्छेविरुद्ध करावी लागतील. साथीदाराचं सहकार्य मिळेल.
कर्क - कामासाठी प्रवास होऊ शकतो. आर्थिक परिस्थिती सुधारु शकते. आज काही कामांच्या बाबतीत यश मिळण्याची शक्यता आहे. सावध राहा. नोकरी- व्यापाराच्या दृष्टीने दिवस आव्हानात्मक असेल. स्वत:वर जास्त लक्ष द्या.
सिंह - आज दररोजच्या कामांमधून वेळ काढून काही इतर गोष्टींवरही लक्ष द्या. आनंदी राहा. आज तुम्ही भावनिक असाल. पण, भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. खाण्यापिण्याच्या बाबतीत सावधगिरी बाळगा.
कन्या - इतरांबद्दल अधिक विचार करु नका. नव्या विचारांनी काम करा. ताण घेऊ नका. जोडीदाराच्या भावना समजण्याचा प्रयत्न करा. कामासाठी मेहनत घ्यावी लागेल.
तुळ - आज तुमचे आचार-विचार कामांत वापरा. प्रयत्नांना यश मिळेल. कुटुंब आणि मित्रांकडून सहकार्य मिळेल. इतरांशी असणारं नातं आणखी दृढ होईल. काही कामं पूर्ण होतील. साथीदारासोबत बाहेर जाण्याचे योग आहेत.
वृश्चिक - व्यापाराच्या नव्या संधी मिळतील. नोकरीच्या ठिकाणी यश मिळण्याची संधी आहे. नवीन वस्तू खरेदी करु शकता. शुभवार्ता कळू शकेल. आज सुरु केलेली कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे.
धनु - दिवस चांगला आहे. आनंदी राहाल. काही लोकांना तुमच्याबाबत द्वेष वाटू शकतो. कोणत्याही बाबतीत हट्ट करु नका. आरोग्याची काळजी घ्या. जे मनात येईल त्या गोष्टींकडे लक्ष द्या.
मकर - जुन्या गोष्टी पुन्हा वर येऊ शकतात. सावध राहा. व्यापारात चढ उतार येऊ शकतात. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीचा योग आहे. कामाच्या निमित्ताने प्रवासयोग असण्याची शक्यता आहे. घाई- गडबड होऊ शकते. अडकलेली कामं पूर्ण होतील.
कुंभ - धनलाभ होण्याची शक्यता आहे. नवी जबाबदारी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी जास्त मेहनत घ्यावी लागेल.
मीन - गुंतवणूक करताना सावध राहा. अनेक दिवसांपासून रखडलेली कामं पूर्ण होऊ शकतात. तब्येतीची काळजी घ्या.