राशीभविष्य : शुक्रवारचा दिवस 'या' राशींसाठी फलदायी

जाणून घ्या कोणाला होणार आजच्या दिवसाचा फायदा   

Updated: Jan 8, 2021, 07:28 AM IST
राशीभविष्य : शुक्रवारचा दिवस 'या' राशींसाठी फलदायी title=

मेष- धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी इतरांवर मात कराल. प्रगतीच्या वाटा खुल्या होणार आहेत. विवाहप्रस्ताव येऊ शकतात. 

वृषभ- तुमच्या कामाचा इतरांवर प्रभाव पडणार आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय आनंदाचा आणि फलदायी आहे. दूर असणाऱ्या एखाद्या व्यक्तीला भेटण्याचा योग आहे. 

मिथुन- आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा य़ोग आहे. अर्थार्जनात वाढ करण्याच्या संधी मिळणार आहेत. नव्या मित्रांना भेटण्याचा योग आहे. कोणत्याही गोष्टीचा गांभीर्यानं विचार करा. 

कर्क- तुमचं संपूर्ण लक्ष हे करिअरवर असणार आहे. तुम्ही अतिसंवेदनशील असाल. सकारात्मक दृष्टीकोन फायद्याचा ठरणार आहे. 

सिंह- सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्य़ाची संधी मिळणार आहे. सध्याची वेळ चांगली आहे. या वेळेचा फायदा करुन घ्या. तुम्हाला एखादी जबाबदारी मिळू शकते. काही अडचणीही दूर होऊ शकतात. 

कन्या- आजचा दिवस शुभ आहे. तुमची एकाग्रता आणि उत्साह परमोच्च शिखरावर असेल . काम आणि मेहनत जास्त करावी लागू शकते. तुम्हाला अनेक कामांमध्ये यश मिळणार आहे. 

तुळ- तुमचं कोणतंही काम अडणार नाही. संकोचलेपणा दूर होणार आहे. ही वेळ चांगली आहे. विचाराधीन कामं पूर्ण होतील. 

वृश्चिक-   पद आणि वेतनाच्या बाबतीत मोठी जबाबदारी मिळणार आहे. एखादी नवी बाब शिकण्याची संधी मिळेल. आर्थिक कारणांनी प्रवास करावा लागू शकतो. 

धनु- काही महत्त्वाच्या व्यक्तींशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. तुम्ही आखलेल्या योजना मार्गी लागणार आहेत. 

मकर- बिजनेस आणि नोकरीच्या ठिकाणी काही नव्या गोष्टी करण्याची संधी मिळणार आहे. महत्त्वाच्या व्यक्तींना भेटण्याची संधी मिळेल. नवं घर खरेदी करण्याचे बेत आखाल. 

कुंभ- एखादं जास्तीचं काम हाती येणार आहे. नोकरीच्या ठिकाणी इतरांची साथ मिळेल. वडिलांची मदत होणार आहे. विचाराधीन कामं पूर्ण होतील. 

मीन- तुमच्या जीवनाच  काही महत्त्वाचे बदल होणार आहेत. जास्तीत जास्त बाबतीत तुम्ही यशस्वी व्हाल. प्रेमसंबंधांमध्ये यशस्वी ठराल.