राशीभविष्य : 'या' राशीसाठी आज शुभदिवस

जाणून घ्या कसा आहे तुमचा आजचा दिवस   

Updated: Jul 30, 2020, 07:19 AM IST
राशीभविष्य : 'या' राशीसाठी आज शुभदिवस  title=
संग्रहित छायाचित्र

मेष- धनलाभाचा योग आहे. शत्रूवर मात करण्यासाठी पावलं उचलाल. नोकरीमध्ये प्रगती करण्याचे योग आहे. मित्रांची मदत मिळेल. मित्रांची मदत मिळेल. विवाह प्रस्ताव येतील. 

वृषभ- तुमच्या कामाच्या पद्धतीत बदल होईल. इतरांचं म्हणणं ऐका. अमुक एका बैठकीचं निमंत्रण येऊ लागतं. प्रवासयोग आहे. जुने वाद मिटतील. 

मिथुन- आर्थिक स्थिती सुधारेल. अर्थार्जनाच्या संधी वाढतील. चांगल्या संधी तुमच्या प्रतिक्षेत आहेत. आजचा दिवस उत्साही असेल. 

कर्क- करिअरच्याच दृष्टीने आज दिवसभर विचार कराल. आज तुम्ही संवेदनशीलपणे निर्णय घ्याल. कुटुंबासमवेत चांगला वेळ व्यतीत होणार आहे. ज्या गोष्टींकडे तुम्ही अडचण म्हणून पाहत आहात त्यामुळेच तुमच्या जीवनात काही सकारात्मक बदल होणार आहे. 

सिंह- सामाजिक वर्तुळात तुम्हाला आदराचं स्थान मिळेल. कोणत्याही कठीण परिस्थितीमध्ये इतरांची साथ लाभेल. कोणा एका अनोळखी व्यक्तीची मोठी मदत होईल. आजचा दिवस तुमच्यासाठी खास आहे. 

कन्या- आजचा दिवस सर्वसामान्य आहे. देवाणघेवाणीच्या बाबतीत काळजी घ्या. एकाग्रता परमोच्च शिखरावर असेल. काम आणि मेहनत जास्त करावी लागू शकते. 

तुळ- कोणतीही कामं अडकणार नाहीत. मनात संकोचलेपणा ठेवू नका. आर्थिक परिस्थिती सुधारेल. वेळेचा पूर्ण वापर करा. 

वृश्चिक - पद, वेतन आणि ओघाओघाने येणारे अधिकार वाढतील. कोणा एका नव्या ठिकाणी जाण्याचा योग आहे. आज काहीतरी नवं शिकाल. आजचा दिवस शुभ आहे. 

धनु- महत्त्वपूर्ण व्यक्तींसोबत तुमचा मेळ बसेल. महत्त्वपूर्ण व्यक्तींशी नातं आकारास येईल. काही नव्या जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील. कुटुंबात एकोपा राखा. 

मकर- व्यापार आणि नोकरीमध्ये चांगली बातमी मिळेल. महत्त्वाची कामं पूर्ण होतील. आर्थिक मदत मिळेल. नवं घर खरेदी करण्याचा विचार कराल. 

कुंभ- एखादं नवं काम हाती घेण्यापूर्वी दैनंदिन जबाबदाऱ्याही लक्षात घ्या. इतरांची मदत करुन तुम्हाला आनंद मिळेल. विचाराधीन कामं पूर्ण होतील. नोकरीच्या ठिकाणी इतरांकडून सहकार्य मिळेल. 

मीन- तुमच्या जीवनात एखादा मोठा बदल घडेल. अडचणी दूर होतील. जास्तीत जास्त कामं पूर्णत्वास न्याल. काहीतरी नवं काम हाती घ्या फायदा होणार आहे.