राशीभविष्य : 'या' राशीच्या व्यक्तींच्या इच्छा पूर्ण होणार

जाणून घ्या कसा आहे तुमचा आजचा दिवस 

Updated: Jul 29, 2020, 07:53 AM IST
राशीभविष्य : 'या' राशीच्या व्यक्तींच्या इच्छा पूर्ण होणार  title=
संग्रहित छायाचित्र

मेष- कामाचा व्याप वाढेल. दिवसभर व्यग्र असाल. काही खास जबाबदारी तुमच्या खांद्यांवर येईल. नोकरीच्या ठिकाणी शांतताच असेल. 

वृषभ- जुने वाद कमी होतील. एखादी नवी कल्पना मनात घर करु शकते. खर्चावर नियंत्रण ठेवा. यश तुमच्या प्रतिक्षेत आहे. 

मिथुन- धनलाभ होण्याची शक्यता आहे. एखाद्या कामातून फायदा होणार आहे, जे प्रदीर्घ काळापासून सुरु होतं. बुद्धीचातुर्यानं अनेक गोष्टी साध्य कराल. आज तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहेत. एखादी शुभवार्ता मिळेल. 

कर्क- अचानक धनलाभ होणार आहे. आजचा दिवस इच्छापूर्तीचा आहे. आर्थिक अडचणींवर तोडगा निघेल. कामावर लक्ष केंद्रीत करा. सहनशीलतेनं पुढं जा. 

सिंह- आर्थिक परिस्थितीत मोठा बदल होणार आहे. महत्त्वाकांक्षा वाढलेली असेल. अपेक्षांवर नियंत्रण ठेवा. वरिष्ठ तुमच्या कामानं प्रभावित होतील, शाबासकीही देतील. 

कन्या- नोकरीच्या ठिकाणी काही नवे बेत आखाल. नव्या संकल्पनांवर काम कराल. विचाराधीन कामं सहजपणे पूर्णत्वास जातील. 

तुळ- विचाराधीन कामं पूर्ण होतील. उधार दिलेले पैसे परत मिळतील. नोकरी आणि व्यवसायात यश मिळणार आहे. मित्रांसमवेत वेळ व्यतीत कराल. 

वृश्चिक- आजचा दिवस भाग्योदयाचा आणि तितकाच खास आहे. आज तुम्हाला मोठा फायदा होणार आहे. नवे करार फायद्याचे ठरतील. आजारपण दूर होईल. 

धनु- नोकरी आणि करिअरमध्ये यश मिळणार आहे. नव्या नोकरीमध्ये बढती मिळेल. नव्या व्यक्तींना भेटण्याची संधी मिळेल. 

मकर- महत्त्वाची कामं पूर्ण होतील. मेहनत करा, फळ मिळेल. जुनी कामं पूर्ण करण्याच्या मागे लागा. अविवाहितांसाठी आजचा दिवस चांगला आहे. इतरांवर मात करण्याची इच्छा तीव्र होईल. 

कुंभ- आज धैर्यानं काम करा. दिवसभर पैशांचाच विचार कराल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी आणि करिअरमध्ये प्रगतीचाच विचार कराल. आरोग्याची काळजी घ्या. 

मीन- आज जे काम हाती घ्याल त्याचा काही ना काही फायदा होणार आहे. अतिघाईमध्ये निर्णय घेणं टाळा. प्रवासासाठी बाहेर पडाल.