राशीभविष्य ०२ मार्च २०२० : 'या' ४ राशींच्या लोकांच आयुष्य बदलणार

बारा राशींच भविष्य 

Updated: Mar 2, 2020, 07:59 AM IST
राशीभविष्य ०२ मार्च २०२० : 'या' ४ राशींच्या लोकांच आयुष्य बदलणार  title=

मुंबई : मार्च महिन्याचा पहिला सोमवार. मराठी नववर्ष याच महिन्यात सुरू होतं. २५ मार्च रोजी गुढीपाडवा असणार आहे. आजचं राशीभविष्य पाहूया. आजचा दिवस हा चार राशींसाठी अत्यंत महत्वाच असणार आहे. या राशीच्या लोकांमध्ये खूप मोठा बदल आज होणार आहे. 

मेष - आज तुम्ही तुमचं मत अतिशय स्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न करा. तसंच समोरच्या व्यक्तीचं बोलणं देखील तेवढंच मनापासून ऐका. प्रत्येक व्यक्तीकडून काहीना काही शिकण्याचा प्रयत्न करा. कौटुंबिक नाती सुधारतील. नोकरदार आणि व्यावसायिक वर्ग आज व्यस्त असणार आहे. परदेश दौऱ्यांचा योग आहे. 

वृषभ - कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यास तयार राहा. नवीन गोष्ट जाणून घेण्यासाठी तयार राहा. जुनी दुखणी बंद होतील. मग ती आरोग्याची असो अथवा इतर कोणतीही. नवीन कपडे खरेदीचा योग आहे. समाज आणि कुटूंब दोन्ही क्षेत्रात रखडलेली काम पूर्ण होतील. इनकम आणि खर्च यामध्ये ताळमेळ साधा. 

मिथुन - पैशांसंबंधीत चांगल्या ऑफर्स मिळतील. याचा खूप विचार. भविष्यात फायदा होऊ शकतो. करिअरकडे लक्ष द्या. अविवाहित लोकांसाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. स्वतःला सिद्ध करण्याचा आजचा महत्वाचा दिवस आहे. मित्रपरिवाराकडून चांगला पाठिंबा मिळेल. 

कर्क - आपलं काम आणि जबाबदाऱ्यांकडे पूर्ण लक्ष द्या. काम आणि करिअर या दोन्ही खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. जवळच्या लोकांसोबतच नातं आणखी खास होऊ शकतं. अचानक धनलाभ होणार आहे. रखडलेला पैसा आणि काम दोन्ही पूर्ण होतील. 

सिंह - पैसे कमावण्याची नवी संधी आज उपलब्ध होऊ शकते. यामुळे जास्तीचे पैसे मिळू शकतात. काही पार्ट टाईम काम देखील करू शकता. ऑफिसमध्ये तणावाचं वातावरण असेल. आरोग्याकडे लक्ष द्या. 

कन्या- खास लोकांच्या मुलाखती होतील. भविष्यात करिअरकडे अधिक लक्ष द्या. व्यवसायात नवीन संधी मिळेल. कुटुंबासोबत वेळ घालवाल. रखडलेली काम पूर्ण होतील. 

तूळ - अनेक गोष्टी आज सहज सुटतील. विश्वासू लोकांकडून घात होण्याची शक्यता आहे. सगळ्या संकंटांवर मात कराल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या आरोग्याकडे लक्ष द्या. 

वृश्चिक - लोकं आज तुमच्या कार्यामुळे प्रभावित होतील. आरोग्याकडे लक्ष द्या. आजचा दिवस तुमचा आनंदाचा असणार आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्याव. अविवाहीतांसाठी उत्तम संधी. 
धनू - अनेक दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण होतील. कौटुंबीक संबंध सुधारतील. तुमची प्रतीमा चांगली राहील. कुटुंबाची काळजी घ्या. आजारपणा दूर होईल.  नवीन गोष्ट सुरू करण्याचा विचार करत असाल तर नक्की करा. 

मकर - अतिघाईमध्ये कोणतंही काम करु नका. आर्थिक व्यवहारांविषयी चर्चा करु नका. अडचणी वाढतील. आरोग्याची काळजी घ्या. पोटाचे विकार होऊ शकतात. ज्येष्ठ व्यक्तींकडे लक्ष द्याल. 

कुंभ - आज तुम्ही प्रेम आणि दृढ विश्वासावर अवलंबून असाल. पण प्रेमात आज थोडी नाराजी स्विकारावी लागेल. काम मनाप्रमाणे कराल. व्यवसायात लाभ होण्याची शक्यता अधिक. शरिराकडे लक्ष द्या. आजूबाजूच्या बदलांमुळे त्रास होण्याची शक्यता. 

मीन - आज तुम्ही सल्ले देण्यासाठी उत्सुक असाल. आजचा दिवस अतिशय चांगला आहे. कामातून आनंद मिळेल. त्याचप्रमाणे व्यवसाय करणाऱ्यांसाठी थोडा खडतर दिवस आहे. काही खास व्यक्तींना भेटण्याची संधी मिळेल. साथीदाराची मदत मिळेल.