Horoscope : एकदंत संकष्टी चतुर्थीला गुरु आदित्य राजयोग! 'या' लोकांना मिळणार नशिबाची साथ

Sankashti Chaturthi 2024 : आज संकष्टी चतुर्थी असून आज अनेक शुभ योगासह गुरु आदित्य राजयोगासह शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे रविवारी राशीच्या लोकांना सूर्यदेवासह गणेशाचा आशीर्वाद मिळणार आहे. 

नेहा चौधरी | Updated: May 26, 2024, 07:29 AM IST
Horoscope : एकदंत संकष्टी चतुर्थीला गुरु आदित्य राजयोग! 'या' लोकांना मिळणार नशिबाची साथ  title=
Ekdant Sankashti Chaturthi

Ekdant Sankashti Chaturthi 2024 : आज एकदंत संकष्टी चतुर्थी अतिशय शुभ आहे. आज गुरु आदित्य राजयोगासोबत साध्ययोग, सर्वार्थ सिद्धी योग आणि मूल नक्षत्र यांचा शुभ संयोग जुळून आला आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार हे योग काही राशींसाठी सकारात्मक ठरणार आहे. त्या लोकांना अनेक लाभासह नशिबाची साथ मिळणार आहे. गणेशजीसोबत सूर्यदेवाची कृपा या लोकांवर बसरणार आहे. कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी जाणून घ्या. (Horoscope 26 may Guru Aditya Rajyog on Ekdant Sankashti Chaturthi These zodiac sign people will get money)

वृषभ रास (Taurus Zodiac) 

वृषभ राशीच्या लोकांसाठी संकष्ट चतुर्थी उत्साहवर्धक ठरणार आहे. वृषभ राशीच्या लोकांना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात नवीन संधी लाभणार आहे. पैसा आणि आरोग्याच्या दृष्टीने संकट चतुर्थी अनुकूल असणार आहे. व्यवसाय करणाऱ्यांना लाभ होणार आहे. आज तुम्हाला उत्साही वाटणार आहे. मित्रांसोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन करणार आहात. 

सिंह रास (Leo Zodiac) 

सिंह राशीच्या लोकांसाठी संकष्टी चतुर्थी यशस्वी ठरणार आहे. या लोकांना नफा मिळविण्याच्या अनेक नवीन संधी लाभणार आहे. तुमचे रखडलेली कामं मार्गी लागणार आहे. तुम्ही कामात केलेल्या मेहनतीमुळे तुम्हाला प्रचंड यश मिळणार आहे. तुमचा आदर आणि सन्मान वाढणार आहे. नशीब तुमच्या बाजूने असणार आहे. व्यवसाय करणारे स्पर्धकांना चांगली स्पर्धा देणार आहे. 

धनु रास (Sagittarius Zodiac) 

संकष्ट चतुर्थी धनु राशीच्या लोकांसाठी शुभ आणि फलदायी ठरणार आहे. गणेश आणि सूर्यदेवाच्या कृपेने तुमची समाजातील प्रतिष्ठित लोकांशी संपर्क होणार आहे. तुम्ही बचत करण्यात यशस्वी होणार आहात. तुमच्यामधील तीव्र इच्छाशक्ती आणि उत्साह आयुष्यात सकारात्मक परिणाम घेऊन येणार आहे. वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होणार आहे. व्यावसायिकांनी केलेल्या परिश्रमाचे योग्य फळ मिळणार आहे. नोकरदार लोक दिवसभर रिलॅक्स मूडमध्ये असणार आहेत. कौटुंबिक जीवन चांगले राहणार आहे. 

कुंभ रास (Aquarius Zodiac) 

संकष्टी चतुर्थी कुंभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. कुंभ राशीचे लोक कौटुंबिक सदस्यांसोबत चांगला वेळ घालवणार आहेत. या राशीचे लोक ज्यांना नोकरी किंवा शिक्षणासाठी परदेशात जायची संधी लाभणार आहे. तुमचे अडकलेले पैसे परत मिळणार आहे. मुलांकडून काही चांगली बातमी मिळणार आहे. व्यापारी चांगला नफा कमवणार आहेत. 

मीन रास (Pisces Zodiac)  

मीन राशीच्या लोकांसाठी संकष्ट चतुर्थी खूप खास ठरणार आहे. तुम्ही पैसे बचत करण्यात यशस्वी होणार असून पैसे कमविण्याचे अनेक संधी मिळणार आहे. आरोग्याशी संबंधित समस्यातून मुक्ती मिळणार आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिक सकारात्मक परिणाम दिसणार आहे. व्यवसायात यश आणि नफा मिळणार आहे. तुम्ही संपूर्ण कुटुंबासह धार्मिक स्थळी भेट देणार आहात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)