राशीभविष्य : 'या' राशींच्या व्यक्तींने लॉकडाऊनमध्ये संयम बाळगावा

असा असेल आजचा दिवस 

Updated: Apr 20, 2020, 08:16 AM IST
राशीभविष्य : 'या' राशींच्या व्यक्तींने लॉकडाऊनमध्ये संयम बाळगावा  title=

मेष - आज मेष राशीची जबाबदारी वाढले. घरी असलेल्या लहान मुलांची जबाबदारी तुमच्यावर आहे. काही विषय खूप समजूतदारपणे सोडवले गेले पाहिजेत. यासाठी संयम बाळगा. भविष्यात खूप चांगला काळ येणार आहे. संकटांशी लढण्यासाठी काही तयारी महत्वाची आहे. 

वृषभ - जुनी दुखणी दूर करण्यासाठी आता संयमाने वागण महत्वाचं आहे. लॉकडाऊन तुम्हाला संयम शिकवणार आहे. स्वतःच्या तब्बेतीची काळजी घ्या. मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करा. 

मिथुन - स्वतःला आवडत्या कामात व्यस्त ठेवा. हे ही दिवस निघून जातील हे लक्षात ठेवा. खूप दिवसानंतर असा वेळ मिळाला आहे. जो फक्त तुमचा आहे. त्यामुळे वेळेचा सदुपयोग करा. 

कर्क - रखडलेला पैसा पुन्हा मिळण्याचा योग जुळून आलाय. कुटुंबासोबतचा हा वेळ अत्यंत महत्वाचा आहे. सहनशक्ती हा सध्याचा मुलमंत्र आहे. 

सिंह - आर्थिक स्थितीमध्ये खूप मोठा बदल होणार आहे. त्यामुळे हा काळ संयमाचा आहे. मेहनत आणि समजुतदारपणा हा तुमच्यासाठी महत्वाचा गुण आहे. 

कन्या - कामाच्या नव्या पद्धतीचा विचार करा. आगामी काळात तुम्हाला स्वतःला कामात झोकून द्यायचं आहे. संयम महत्वाचा आहे. 

तूळ - या आधी कधीच एवढा वेळ मिळाला नव्हता स्वतःसाठी. पण आता मिळालेल्या संधीचा फायदा घ्या. संयम बाळगा. 

वृश्चिक - आपल्यासाठी आजचा दिवस खास आहे. समजुतदारपणा हाच आजचा मंत्र आहे. घरात संयमाने राहा. सगळ्यांना एकत्र बांधून ठेवा. 

धनू - नोकरी, करिअर आणि पैसा याचा सध्या काही विचार करू नका. नवीन गोष्टी शिकण्याचा या काळात प्रयत्न करा. कुटुंबासोबत वेळ घालवा. 

मकर - या लॉकडाऊनच्या काळात काही महत्वाची काम करून घ्या. तसेच कुटुंबाची काळजी घ्या. 

कुंभ - समजुतदारपणे आज तुम्हाला दाखवावा लागेल. धनलाभ होण्याचा योग आहे. पुढे जाण्यासाठी काही नवीन गोष्टी शिकाव्या लागतील. 

मीन - तुम्ही संयम बाळगा. सध्या कोणतेही महत्वाचे निर्णय घेऊ नका. स्वतःला कामात व्यस्त ठेवा.