Horoscope 20 March 2022: रविवारी 'या' 3 राशींच्या व्यक्तींनी सतर्क रहावं

जाणून घेऊया काय आहे तुमचं राशीभविष्य.

Updated: Mar 20, 2022, 08:09 AM IST
Horoscope 20 March 2022: रविवारी 'या' 3 राशींच्या व्यक्तींनी सतर्क रहावं title=

रविवार तुमचा दिवस संमिश्र असणार आहे. यावेळी तुम्ही कुटुंबासोबत बाहेर जाण्याची शक्यता आहे. मात्र अशा 3 राशी आहेत, ज्यांनी आजच्या दिवशी खूप काळजी घेणं आवश्यक आहे. जाणून घेऊया त्या राशी कोणत्या आहेत.

मेष (Aries)

आजच्या दिवशी तुमचं आरोग्य चांगलं राहणार आहे. यावेळी तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. नातेवाईक आणि मित्रांशी तुमचे संबंध सुधारतील.

वृषभ (Taurus)

कामाच्या ठिकाणी नवीन गोष्टींमुळे तुम्ही संपूर्ण वेळ कामात असाल. काही रखडलेले प्रकल्प आता मार्गी लागतील. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळू शकतं.

मिथुन (Gemini)

सरकाकडून तुम्हाला प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे लाभ मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही संधीचा पुरेपूर फायदा केलात तर तुमचं व्यावसायिक जीवन तुम्हाला भविष्यात खूप फायदे होतील.

कर्क (Cancer)

हा काळ तुमच्यासाठी भाग्यवान नाही. भावंडांशी झालेल्या वादामुळे कौटुंबिक जीवनात अस्थिरता येऊ शकते. प्रेमसंबंध चांगले राहतील. तर तुम्हाला आर्थिक लाभही मिळू शकतो.

सिंह (Leo)

राजकारण किंवा सामाजिक कार्याशी संबंधित लोकं अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. तुम्हाला सन्मान मिळेल आणि काही नवीन जबाबदारीही मिळण्याची शक्यता.

कन्या (Virgo)

तुम्ही कोणत्या नवीन भागीदारीमध्ये प्रवेश करणार. जर कोणतेही कायदेशीर प्रकरण प्रलंबित असेल तर त्यामध्ये यश मिळण्याची शक्यता.

तूळ (Libra)

आजच्या दिवशी तुमच्यापैकी काही महत्त्वाच्या लोकांशी संपर्क प्रस्थापित करून अधिक प्रभावशाली होतील.

वृश्चिक (Scorpio)

व्यावसायिक क्षेत्रात तुम्हाला खूप चांगले परिणाम मिळतील. प्रभावशाली लोकांशी संपर्क लाभदायक ठरेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. त्याचप्रमाणे आर्थिक स्थितीही सुधारेल.

धनु (Sagittarius)

तुमच्या निर्णयांकडे योग्य लक्ष द्या. कोणतीही गुंतवणूक करायची असल्यास तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेणं उचित ठरेल.

मकर (Capricorn)

व्यावसायिक संबंध आणि व्यावसायिक संदर्भात व्यवहार करण्यासाठी अनुकूल कालावधी आहे. प्रेमप्रकरणात तुम्ही भाग्यवान असणार आहे.

कुंभ (Aquarius)

तुम्हाला तुमच्या जीवनसाथी किंवा सहकाऱ्यांचं सहकार्य मिळेल. यामुळे तुम्ही कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू शकणार नाही. ही परिस्थिती तुम्हाला मानसिक गोंधळ आणि तणावात टाकेल. 

मीन (Pisces)

रविवारी तुमचा दिवस वादांमध्ये जाण्याची शक्यता आहे.