लग्नात येत आहेत वारंवार बाधा, हरतालिकेला करा 'हे' उपाय, मिळेल समाधान

लग्न करण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या व्यक्तींसाठी हरतालिकेचं व्रत महत्त्वाचं..  

Updated: Aug 28, 2022, 06:56 AM IST
लग्नात येत आहेत वारंवार बाधा, हरतालिकेला करा 'हे' उपाय, मिळेल समाधान  title=

मुंबई : लग्न प्रत्येकाच्या आयुष्यातील खास आणि महत्त्वाचा टप्पा असतो. एक ठराविक वेळेत लग्न झालं पाहिजे असं वरिष्ठ सांगतात, पण अनेकदा लग्नात अनेक अडचणी येतात. कधी मनासारखा मुलगा मिळत नाही, तर कधी मुलांना लग्नासाठी मुलगी भेटत नाही. यामुळे वय निघून जाते. अनेकदा आपल्या आयुष्याती खास व्यक्ती आपल्यापासून दुरावतो आणि लग्न तुटतं. असं असेल तर, हरतालिकेच्या दिवशी काही खास उपाय करून तुम्ही या समस्यांपासून समाधान मिळवू शकता.

हरतालिकेच्या दिवशी उपवास केल्याने पती-पत्नीचं नातं घट्ट होतं, परंतु ज्यांचे लग्न होत नाही किंवा लग्नात पुन्हा-पुन्हा अडचण येते त्यांच्यासाठी हरतालिकेचा उपवास सुद्धा महत्त्वाचा आहे.

लग्नात सतत बाधा येत असतील, तर खास उपाय 
ज्यांच्या लग्नात सतत बाधा येत असतील त्यांनी हरतालिकेचं निर्जल किंवा फळ आहार व्रत ठेवा. शिवाय पिवळ्या रंगाचे कपडे घाला. त्यानंतर शिवलिंगावर पांढरे चंदन आणि जल अर्पण करा. यासोबतच पार्वतीला कुंकू अर्पण केल्यानंतर ओम पार्वतीपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. पार्वतीला अर्पण केलेलं कुमकुम सोबत ठेवा. असं केल्याने तुमची समस्या दूर होईल. 

'या' उपायांमुळे पती-पत्नीमध्ये होईल आनंद निर्माण
पती-पत्नीमध्ये समन्वय नसल्यामुळे अनेकवेळा भांडणं होतात. तुम्हालाही हीच समस्या भेडसावत असेल तर हरतालिकेचं निर्जल किंवा फळ आहार व्रत ठेवा. . पूर्ण श्रृंगार करून मंदिरात जा आणि शंकराचे दर्शन घ्या. यादरम्यान मंदिरात चार तोंडी दिवा लावायला विसरू नका आणि मंदिरात सिंदूर आणि लाल बांगड्या अवश्य अर्पण करा. यासोबत "नमः शिवाय" मंत्राचा 108 वेळा जप करावा. असं केल्याने तुमची समस्या दूर होईल. 

 (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. त्यामुळे  ZEE 24TAAS याची पुष्टी करत नाही.)