Jupiter Transit 2023 in Marathi : काही राशींच्या लोकांना मोठा फायदा होणार आहे. गुरु गोचरमुळे त्यांच्या हाती पैसा खुळखुळणार आहे. तसेच करिअरमध्ये मोठी संधी उपलब्ध होणार आहे. अर्थात हे गुरुमुळे शक्य आहे. गुरु म्हणजे बृहस्पतिला देवगुरु म्हटले गेले आहे. ज्योतिषशास्त्रात बृहस्पति ग्रहाचे वर्णन सौभाग्य देणारा ग्रह आहे. लग्नासाठी गुरुची स्थिती देखील खूप महत्वाची आहे. 2023 मध्ये गुरुच्या स्थितीत अनेक महत्त्वाचे बदल होणार आहेत. मार्चमध्ये बृहस्पतिचा अस्त होईल, त्यानंतर गुरुचा उदय होईल. दुसरीकडे, 22 एप्रिल 2023 रोजी, बृहस्पति स्वतःची राशी मीन सोडून दुसऱ्या राशीत प्रवेश करेल. गुरु हा राशी मेष राशीत प्रवेश करणार आहे. बृहस्पति संक्रमणाचा सर्व 12 राशींवर मोठा प्रभाव पडेल. दुसरीकडे, 3 राशीच्या लोकांवर याचा खूप मोठा लाभ होणार आहे.
मेष : ज्योतिषशास्त्रानुसार गुरु गोचरमुळे मेष राशीच्या लोकांना खूप लाभ होईल. देवगुरु गुरु राशी बदलून मेष राशीत प्रवेश करणार असल्याने याचा मोठा प्रभाव दिसून येईल. त्यामुळे मेष राशीच्या लोकांना शुभ फळ मिळेल. या लोकांना कामाशी संबंधित काही चांगली माहिती मिळू शकते. पदोन्नती होऊ शकते. भाग्यात वाढ होईल. त्यामुळे आनंद द्विगुणीत होईल. नातेवाईकांना तुम्ही मदत करु शकाल.
मिथुन : गुरुचा राशी बदलामुळे मिथुन राशीच्या लोकांसाठी खूप फायदा होणार आहे. या लोकांच्या आर्थिक स्थितीत चांगली तेजी येऊ शकते. तुम्हाला एखादे मोठे पद मिळू शकते. नोकरी बदलण्याचीही शक्यता आहे. तुम्हाला व्यवसायात चांगला नफाही मिळू शकतो आणि या काळात तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तारही करु शकता. त्यामुळे भविष्यात याचा लाभ होऊन हाती पैसा येईल आणि तुमची आर्थिक स्थिरता चांगली राहिल.
सिंह : गुरु गोचरमुळे सिंह राशीच्या लोकांसाठी मोठा लाभ होणार आहे. देवगुरु गुरु गोचरने भाग्य उजळेल. मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. कामात यश मिळेल. कोणतीही मोठी संधी मिळू शकते. करिअरमध्ये फायदा होईल. तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो आणि नोकरीत प्रमोशन मिळू शकते. काहींना अपत्यप्राप्तीचा आनंद मिळू शकतो. त्यामुळे घरात मोठे आनंदाचे वातावरण असेल.
(Disclaimer:येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)