Gudi Padwa Wishes in Marathi: हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढी उभारली जाते. गुढीपाडवा म्हणजे नववर्ष. येत्या काही दिवसांवरच दिवसातच हा सण येतोय. त्याची त्याची तयारी सुरू झाल्याचं पहायला मिळतंय. अशातच तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांना, मित्र मित्रिणींना किंवा नातेवाईकांना शुभ संदेश देणार असाल, आत्ताच सेव घ्या हे संदेश!
"गुढी उभारू आनंदाची,
समृद्धीची, आरोग्याची,
समाधानाची आणि उत्तुंग यशाची,
नव वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा"
"नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,
त्याच्यावर चांदीचा लोटा,
उभारुनी मराठी मनाची गुढी,
साजरा करूया हा गुढीपाडवा…
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा"
सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट..
आनंदाची उधळण अन सुखांची बरसात…
दिवस सोनेरी
नव्या वर्षाची सुरुवात…
गुडीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा!
आशेची पालवी, सुखाचा मोहर,
समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी,
नववर्षाच्या शुभेच्छा, तुमच्यासाठी…
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
वसंत ऋतूच्या आगमनी,
कोकिळा गायी मंजुळ गाणी,
नव वर्ष आज शुभ दिनी,
सुख समृद्धी नांदो जीवनी.
गुढी पाडव्याच्या आणि नूतन
वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात मराठी नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूच्या आगमनाला सुरूवात होते. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी घरोघरी गुढी उभारण्याचा कार्यक्रम केला जातो, त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.