Garuda Purana Death Secrets: पृथ्वीतलावर मृत्यू ही अटळ गोष्ट आहे. जो जीव जन्माला आला, त्याचा मृत्यू होणारच हे निर्विवाद सत्य आहे. शिव पुराण, गरूड पुराण आणि कठोपनिषद या काही ग्रथांमध्ये मृत्यू झाल्यानंतर आत्म्याचे नेमके काय होते, याबाबत माहिती दिली आहे. गरुड पुराणात आत्म्याच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत आणि त्यानंतरच्या प्रवासाविषयी अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. त्यातून अशी रहस्ये उलगडतात, ज्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांच्या मनात कायम आहे. इतकेच नाही तर गरुड पुराणात मृत्यूशी संबंधित संस्कारांबाबतही अनेक नियम सांगण्यात आले आहेत, ज्याचे पालन केल्याने मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळते, त्याला चांगली गती मिळते. दुसरीकडे, पितरांच्या आशीर्वादाने व्यक्तीच्या कुटुंबात खूप प्रगती, सुख आणि समृद्धी प्राप्त होते.
गरुड पुराणानुसार, मृत्यूनंतर मानवी शरीरातील आत्मा 13 दिवस आपल्या घरातच राहतो. म्हणूनच मृत्यूनंतर 13 दिवस अनेक संस्कार केले जातात. मृत व्यक्तीच्या आत्म्यासाठी दररोज अन्न बाहेर ठेवले जाते. यानंतर तेरावा घातला जातो. तसेच पिंडदान केले जाते. वास्तविक मृत्यूनंतर यमदूत लगेच आत्म्याला यमलोकात घेऊन जातात. जिथे त्याच्या कर्मांचा हिशोब केला जातो आणि त्यानंतर 24 तासांनंतर आत्मा पुन्हा आपल्या घरी परततो. यामागचे कारण म्हणजे त्याची कुटुंबाप्रती असलेली ओढ. येथे आत्मा आपल्या नातेवाईकांमध्ये फिरत असतो, त्यांना हाक मारत असतो. पण त्यांचा आवाज कुटूंबापर्यंत पोहचत नाही.
वाचा: Whatsapp वरूनही बुक करू शकता Cab, Uber; फॉलो करा 'या' स्टेप्स
या दरम्यान आत्मा इतका अशक्त होतो की तो कुठेही प्रवास करू शकत नाही. त्यानंतर कुटुंबातील सदस्य पिंडदान करतात, तेराव्या दिवशी आवश्यक संस्कार करतात, ज्यामुळे आत्म्याला शक्ती मिळते आणि ते यमलोकात जाते. एवढेच नाही तर पिंडदानाच्या वेळी दिलेले अन्न एका वर्षासाठी आत्म्याला शक्ती देते. म्हणूनच पिंड दान खूप महत्वाचे मानले जाते. दुसरीकडे, ज्यांच्यासाठी पिंडदान केले जात नाही, त्यांना यमदूत 13व्या दिवशी यमलोकाकडे ओढतात. त्यामुळे मृत व्यक्तीच्या आत्म्याला खूप त्रास सहन करावा लागतो. याउलट ज्यांचे कर्म वाईट राहतात त्यांच्या आत्म्यालाही खूप त्रास होतो.