Gajkesari Yog 2023 : श्रावण महिन्यात बनतोय गजकेसरी योग; 'या' राशींचे अच्छे दिन होणार सुरु

Gajkesari Yog 2023 : 10 जुलै रोजी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी उपवास केला जाणार आहे. मंगळवारी 4 जुलै 2023 पासून श्रावण महिना सुरू होतोय. भगवान शिवाला समर्पित या महिन्यात महादेवाचे भक्त पूर्ण भक्तिभावाने त्यांची पूजा करतात. 

Updated: Jul 3, 2023, 10:27 PM IST
Gajkesari Yog 2023 : श्रावण महिन्यात बनतोय गजकेसरी योग; 'या' राशींचे अच्छे दिन होणार सुरु title=

Gajkesari Yog 2023 : मंगळवारी 4 जुलै 2023 पासून श्रावण महिना सुरू होतोय. भगवान शिवाला समर्पित या महिन्यात महादेवाचे भक्त पूर्ण भक्तिभावाने त्यांची पूजा करतात. 10 जुलै रोजी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी उपवास केला जाणार आहे. यावेळी श्रावन दोन महिने असून 4 जुलैपासून सुरू होऊन 31 ऑगस्टपर्यंत राहणार आहे. 

या दरम्यान शश राजयोग, गजकेसरी योग, लक्ष्मी नारायण योग तसंच बुधादित्य अद्भूत योग तयार होणार आहेत. श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारचा व्रत गजकेसरी योगात येत असल्याने त्याचं महत्त्व आणखी वाढणार आहे. यादिवसी गुरु आणि चंद्र मीन राशीत असणार आहे. हा गजकेसरी योग काही राशींच्या व्यक्तींसाठी खास असणार आहे.

मेष रास

मेष राशीचा स्वामी मंगळ आहे, अशा स्थितीत हा राजयोग शुभ असणार आहे. यावेळी अनेक क्षेत्रात मोठं यश मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात आनंद मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी सर्व गोष्टी मनाजोग्य घडण्याची शक्यता आहे. शोध करणाऱ्या व्यक्तींना नोकरी मिळण्याची शक्यता आहे.

मीन रास

हा राजयोग या राशींसाठी खूप शुभ असणार आहे. या काळात आकस्मिक आर्थिक लाभाच्या संधी मिळणार आहे. एखाद्या मोठ्या प्रकल्पात तुमचं काम पूर्ण होऊ शकते. जुन्या केलेल्या गुंतवणुकीचा लाभ मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहणार आहे. प्रगतीचे मार्ग खुला होतो. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना नोकरीचे फायदे मिळतील.

सिंह रास

हा राजयोगाचा काळ रहिवाशांसाठी शुभ लाभ घेऊन येणार आहे. नोकरीमध्ये नवीन संधी मिळू शकतात. घरात खूप पैसा येण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. नशीब तुमच्या सोबत राहील. नोकरीत बढती आणि कौतुकाचा लाभ मिळू शकतो. व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. रखडलेली सर्व कामे पूर्ण होतील. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )