Gajkesri Rajyog 2024: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रह एका विशिष्ट कालावधीत एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. ग्रहांच्या या गोचरमुळे शुभ आणि अशुभ योग तयार करतात. या योगांचा मानवी जीवनावर परिणाम होताना दिसतो. गुरू मेष राशीत प्रवेश करत असून 18 ऑक्टोबर रोजी चंद्र मेष राशीत प्रवेश करणार आहे.
या दोन ग्रहांच्या संयोगाने गजकेसरी राजयोग निर्माण होणार आहे. वैदिक ज्योतिषात हा राजयोग अत्यंत शुभ आणि फलदायी मानला जाणार आहे. या राजयोगाच्या प्रभावामुळे 3 राशीच्या लोकांचं नशीब उजळू शकणार आहे. या राजयोगाच्या निर्मितीमुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.
या राशींच्या व्यक्तींसाठी गजकेसरी राजयोग लाभदायक ठरणार आहे. हा राजयोग तुमच्या राशीतून पाचव्या भावात तयार होणार आहे. यावेळी तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकणार आहे. शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर ती करू शकता. तुमचं लव्ह लाईफ रोमँटिक राहणार आहे. तुमचं मन कमाईने आणि कामाच्या ठिकाणी प्रगतीने प्रसन्न राहणार आहे. यावेळी तुम्हाला अनपेक्षित पैसे देखील मिळू शकतात.
गजकेसरी राजयोग तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकणार आहे. यावेळी तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित पैसे मिळतील. तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील तर ते तुम्हाला मिळू शकतात. तुमचा व्यवसाय आणि मालमत्ता वाढेल आणि यावेळी तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता. सामाजिक क्षेत्रात तुमची प्रतिष्ठा आणि प्रभाव वाढणार आहे. यावेळी विचारपूर्वक निर्णय घ्या.
गजकेसरी राजयोग तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतो. तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. व्यवसाय करणाऱ्या लोकांना फायदा होईल. तुम्हाला गुप्त शत्रूंवरही विजय मिळवता येणार आहे. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. तुम्हाला गुंतवणुकीचा फायदा होऊ शकतो. मुलांकडून तुम्हाला लाभ आणि आनंद मिळू शकणार आहे.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )