Planet Transits in July 2024: ज्योतिष्य शास्त्रानुसार, दर महिन्याला काही ग्रह राशीमध्ये बदल करतात. यावेळी जुलै महिन्यात मंगळ, बुध, सूर्य आणि शुक्र असे चार ग्रह आपली राशी बदलून एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतील. शुक्र मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी बुधाच्या संयोगाने लक्ष्मी नारायण राजयोग तयार होणार आहे. दुसरीकडे मंगळ मेष राशीतून वृषभ राशीत जाणार आहे. सूर्य आणि गुरू यांच्याशी संयोग निर्माण होणार आहे.
तसंच जुलै महिन्यात सूर्य मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी सूर्याचा संयोग बुध आणि शुक्र राशीसोबत होणार आहे. सूर्यानंतर बुध कर्क राशीतून बाहेर पडून सिंह राशीत प्रवेश करेल. शेवटी शुक्र पुन्हा एकदा आपली राशी बदलून सिंह राशीत प्रवेश करणार आहे. या ग्रहांच्या गोचरमुळे काही राशींच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम होणार आहे. जाणून घेऊया यावेळी कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.
मेष राशीच्या लोकांना जुलैमध्ये ग्रहाच्या गोचरमुळे अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. प्रतिष्ठित लोकांशी तुमचा संवाद वाढू शकणार आहे. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये मिळेल. या महिन्यात तुमच्या कुटुंबात काही शुभ घटना घडू शकतात. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. अनावश्यक खर्च टाळा आणि हुशारीने काम करा.
मिथुन राशीच्या लोकांसाठी जुलै महिना खूप खास असणार आहे. कठोर परिश्रम केल्याने तुमचे धैर्य वाढणार आहे. तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील. या महिन्यात तुम्ही तुमच्या व्यवसायात खूप व्यस्त असणार आहात. तुमच्या स्वभावात सौम्य राहाल आणि विनाकारण कोणावरही रागावू नकाकुटुंबात काही पूजा किंवा शुभ कार्याचे आयोजन केले जाऊ शकते.
तूळ राशीच्या लोकांसाठी जुलै महिना आर्थिक लाभाने भरलेला असणार आहे. तुमच्या घरात शुभ कार्ये होऊ शकणार आहे. तुमच्या घरातील विवाहयोग्य सदस्यांमधील नातेसंबंध निश्चित होऊ शकतात. या महिन्यात तुमचं जीवन सुख-सुविधांनी भरलेले असणार आहे. या महिन्यात तुमच्या कुटुंबासोबत फिरायला देखील जाऊ शकता.
मकर राशीच्या लोकांसाठी हा महिना खूप चांगला आहे. तुमच्या पदोन्नतीच्या संधी आहेत. तुमच्या सुखसोयी वाढणार आहेत. व्यवसायातही चांगला नफा होईल. तुम्हाला काही कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागू शकणार आहे. आर्थिक लाभ मिळविण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. महिन्याच्या शेवटी तुम्हाला अपेक्षित नफा मिळेल.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )