Shukra Gochar: शुक्र ग्रहाचा वृश्चिक राशीत प्रवेश; 'या' राशींना धनलाभ होण्याचे योग

Shukra Gochar In Scorpio: शुक्र हा आकर्षण, भौतिक सुख, सौंदर्य, विवाह, प्रेम इत्यादींचा कारक मानला जातो. अशा परिस्थितीत शुक्र ग्रहाच्या गोचरमुळे काही राशींना विशेष लाभ मिळू शकणार आहे.

सुरभि जगदीश | Updated: Dec 27, 2023, 10:45 AM IST
Shukra Gochar: शुक्र ग्रहाचा वृश्चिक राशीत प्रवेश; 'या' राशींना धनलाभ होण्याचे योग title=

Shukra Gochar In Scorpio: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या ठरलेल्या वेळी गोचर करतो. यावेळी नुकतंच शुक्र ग्रहाने गोचर केलं आहे. 25 डिसेंबरला शुक्र ग्रहाने गोचर केला आहे. संपत्ती, समृद्धी आणि आकर्षण देणारा शुक्र, काही काळानंतर आपली राशी बदलतो. शुक्राच्या राशी परिवर्तनाचा प्रभाव नवीन वर्षाच्या सुरुवातीलाही दिसून येईल. 

शुक्र हा आकर्षण, भौतिक सुख, सौंदर्य, विवाह, प्रेम इत्यादींचा कारक मानला जातो. अशा परिस्थितीत शुक्र ग्रहाच्या गोचरमुळे काही राशींना विशेष लाभ मिळू शकणार आहे. जाणून घेऊया शुक्र वृश्चिक राशीत प्रवेश झाल्याने कोणत्या राशींना फायदा होणार आहे. 

वृषभ रास (Vrishabha Zodiac)

शुक्र गोचरमुळे या राशीच्या लोकांसाठी अपार यशासोबत आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना लाभ मिळेल. व्यवसायातही नफा मिळू शकतो. व्यवसायासाठी भागीदार किंवा गुंतवणूकदाराचा शोध पूर्ण होऊ शकतो. वैवाहिक जीवनात सुरू असलेल्या समस्या संपुष्टात येऊ शकतात. दोघांमध्ये चांगला समन्वय असणार आहे. 

कर्क रास (Kark Zodiac)

कर्क राशीच्या पाचव्या घरात शुक्र प्रवेश झाल्याने या राशीच्या लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. यासोबतच जोडीदारासोबत तुमचा वेळ चांगला जाईल. विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रातही चांगली कामगिरी करतील. तुमच्या पालकांसोबत तुमचा वेळ चांगला जाईल. जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर या काळात असे करणे फायदेशीर ठरू शकते.

सिंह रास ( Singh Zodiac)

सिंह राशीच्या लोकांसाठी शुक्राचे संक्रमण फायदेशीर ठरू शकणार आहे. या राशीच्या लोकांना शारीरिक आणि मानसिक तणावापासून आराम मिळू शकतो. तुम्हाला कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. याशिवाय व्यवसाय आणि कला क्षेत्राशी संबंधित लोकांना लाभ होईल. जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर या कालावधीत असं करणं फायदेशीर ठरू शकतं.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)