तुम्ही 'या' गोष्टी कधी इतरांच्या तळहातावर देत नाही ना? असं करत असाल तर आजच बदला सवय!

जाणून घेऊया त्या गोष्टींबद्दल, ज्या तळहातावर दिल्यास घरातील भांडण होतात.

Updated: Jul 9, 2022, 08:02 AM IST
तुम्ही 'या' गोष्टी कधी इतरांच्या तळहातावर देत नाही ना? असं करत असाल तर आजच बदला सवय! title=

मुंबई : ज्योतिष शास्त्रामध्ये, घरातील सुख-समृद्धी हरण करणाऱ्या अशा गोष्टी करण्यास मनाई आहे. त्यामुळे या गोष्टी कधीही करू नयेत. उदाहरणार्थ, वडिलांनी तळहातावर काही वस्तू देण्यास नकार दिल्याचं अनेकदा पाहायला मिळतं. या वस्तू थेट कुणाच्या तळहातावर देणं चांगलं मानलं जात नाही. असं केल्याने माता लक्ष्मीचा कोप होतो, घरात दारिद्र्य येते. घरात अशांतता, भांडणं होतात. 

जाणून घेऊया त्या गोष्टींबद्दल, ज्या तळहातावर दिल्यास घरातील भांडण होतात.

तळहातावर देऊ नका या गोष्टी

  • ज्योतिष शास्त्रानुसार कोणाच्याही हातावर मीठ देऊ नये. त्यापेक्षा ताट किंवा वाटीत ठेवून मीठ द्यावं. थेट दुसऱ्याच्या हातात मीठ दिल्याने भांडण होतं आणि पुण्य कमी होतं.
  • ज्योतिषशास्त्राप्रमाणे, मिरची थेट कोणाच्याही हातावर देऊ नका. त्याऐवजी नेहमी मिरची एका भांड्यात किंवा प्लेटमध्ये ठेवा. अन्यथा, असं केल्याने त्यांच्यात भांडणं होतात.
  • पिण्यासाठी कोणाच्याही हातात किंवा ओंजळीमध्ये पाणी देऊ नये, तर भांड्यातच द्यावं. यामुळे धन, धर्म आणि पुण्य नष्ट होतं असं मानलं जातं.
  • भाकरी नेहमी ताटात ठेवून द्यावी. हातात भाकरी दिल्याने घरातील समृद्धी निघून जाते. त्यामुळे नेहमी आदराने भाकरी द्या. कुणाच्या ताटात रोटी सर्व्ह केली तरी ती चपाती किंवा भाकरी हातात घेऊ नका. तर ताटात भाकरी ठेवा आणि मग कुणाच्या ताटात सर्व्ह करा.

(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. यापासून कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही. झी 24 तास याचं समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)