Vasubaras 2024 : अवघ्या काही दिवसांवर दिवाळीचा सण आलाय. घरोघरी महिलांची लगबग पाहिला मिळतेय. असं म्हणतात दिवाळीत लक्ष्मी घरोघरी जाते. माता लक्ष्मीला स्वच्छता आवडते त्यामुळे ज्या घरात स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मीचा वास असतो. यासाठी महिलांची घरात स्वच्छता मोहीम सुरु झालीय. दिवाळीचा पहिला दिवस हा वसुबारसपासून सुरु होतो. वसुबारस कधी आहे, पूजा विधी आणि महत्त्व जाणून घ्या. (diwali first day Vasubaras 2024 Date tithi shubh muhurat puja vidhi and importance in marathi)
आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथीला वसुबारस साजरी करण्यात येते. पंचांगानुसार द्वादशीची तिथी 28 ऑक्टोबर 2024 संध्याकाळी 7.35 मिनिटांपासून 29 ऑक्टोबर संध्याकाळी 5.04 मिनिटांपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार 28 आक्टोबर येत्या सोमवारी वसुबारस साजरी करायची आहे.
पोळाला बैलाची पूजा करण्याची गावोगावी परंपरा आहे. तशीच वसुबारसला गाय वासरुची पूजा केली जाते. वसुबारसच्या दिवशी सायंकाळी गाईची आणि वासराची पूजा केली जाते. लक्ष्मी देवीचं आपल्या घरी आगमन व्हावे यासाठी गाय-वासराची पूजा करण्यात येते. गोवत्स द्वादशीचा मुहूर्त हा सायंकाळी 05.31 मिनिटे ते 08.09 मिनिटांपर्यंत आहे. पूजा करताना गाय आणि वासराची पूजा केली जाते. विशेष महत्त्व असून या दिवशी उपवास केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते.
दिवाळी हा पहिला सण समुद्रमंथन या पौराणिक प्रसंगाशी संबंधित आहे. असं म्हणतात समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. कामधेनू हे मातृत्व, प्रजनन, देवत्व आणि पालनपोषण यांच्या आशीर्वादांशी संबंध जोडला आहे. दैवी गाय कामधेनू सात महान देवांची देणगी म्हणून उदयास आली अशी मान्यता आहे. भगवान श्रीकृष्ण, विष्णू अवताराशीही त्याचा संबंध आहे.
हा सण माय लेकाच्या नात्याची पूजा म्हणून पाहिली जाते. म्हणून काही ठिकाणी महिलांचा या दिवशी मुलांसाठी उपवास करतात. वसुबारला घरासमोर रांगोळी काढा. घरातील गाय वासरू यांना आंघोळ घाला. शहरात घरात गाय वासराची मूर्ती असेल त्याची पूजा करा. अभिषेक करुन नवी वस्त्रं घाला. ह्या दिवशी हिंदू परंपरेनुसार, गहू, मूग खाले जात नाही. स्त्रिया बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडला जातो. भरपूर कृषी उत्पादन व्हावे, आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावं आणि सुख लाभावं म्हणून वसुबारसची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी संध्याकाळी घरातील तुळशीपुढे आणि दारात, परिसरात पणत्या लावून रोषणाई करा.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)