Difference between Rama and Krushna Tulsi: हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला खूप महत्त्व आहे. प्रत्येकांच्या अंगणात आपल्याला तुळस पाहायला मिळते. अंगण नसेल तर गॅलरीत किंवा खिडकीत तुळसीचं रोप लावलेलं असतं. ज्या घरात तुळशीचे रोप असते तिथे देवी लक्ष्मीचा वास असतो, असं मानलं जात. तुळशीचे रोप घरात ठेवल्याने घरात सकारात्मकता आणि सुख-समृद्धी येते. सकाळी आणि संध्याकाळी तुळशीची पूजा केल्याने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची आशीर्वाद प्राप्त होते. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रातही तुळशीला महत्त्वाचा दर्जा देण्यात आला आहे. यासोबतच तुळशीची पूजा, देखभाल इत्यादीबाबत काही नियमही सांगण्यात आले आहेत. त्यांचे पालन केल्याने विशेष फायदा होतो.
घरामध्ये कोणती तुळशी लावावी
तुळशीचे दोन प्रकार आहेत, राम आणि कृष्ण तुळस. पण घरात कोणते तुळशीचे रोप लावणे शुभ आहे याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. यासाठी या दोघांमधील फरक जाणून घेणेही महत्त्वाचे आहे.
राम तुळस : रामा तुळशीच्या पानांचा रंग हिरवा असून त्याची पाने गोड असतात. राम तुळस भगवान श्रीरामांना अत्यंत प्रिय आहे. घरामध्ये राम तुळशीचे रोप लावल्याने घरात सुख, शांती आणि ऐश्वर्य नांदते. घरात असणे खूप शुभ असते.
कृष्ण तुळस : कृष्ण तुळस घरी लावणे खूप शुभ आहे, तसेच आयुर्वेदातही याला खूप महत्त्व दिले गेले आहे. कृष्ण तुळशीचा उपयोग अनेक औषधांमध्ये केला जातो. कृष्ण तुळशीची पाने काळ्या किंवा जांभळ्या रंगाची असतात. हे भगवान श्रीकृष्णाशी संबंधित आहे.
तुळशीच्या रोपाबद्दल महत्वाचे नियम
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. याला ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)