Horoscope 21 January 2024 : सावधान! कामाच्या ठिकाणी तुमच्याबद्दल सहकारी कटकारस्थान रचणार

Rashi Bhavishya 21 January 2024 : आज पौष पुत्रदा एकादशी आणि रविवार असल्याने आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या आजचं राशीभविष्य 

नेहा चौधरी | Updated: Jan 21, 2024, 06:45 AM IST
Horoscope 21 January 2024 : सावधान! कामाच्या ठिकाणी तुमच्याबद्दल सहकारी कटकारस्थान रचणार title=
daily rashi bhavishya daily horoscope today rashi bhavishya 21 january 2024 and Putrada Ekadashi 2024

Horoscope 21 January 2024 : रविवार हा सुट्टीचा दिवस असतो. त्यामुळे तुम्ही सुट्टीनिमित्त काही प्लॅन केले असतीलच. त्यात आज पौष पुत्रदा एकादशी आहे. उद्या सोमवार 22 जानेवारी म्हणजे अयोध्येत रामलल्ला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यामुळे सर्वत्र भक्तीमय वातावरण आहे. अशात आजचा रविवार तुमच्यासाठी कसा असेल जाणून आजचं राशीभविष्य.

मेष (Aries Zodiac) 

आर्थिक समस्या जाणवणार आहे. कामाच्या ठिकाणी मल्टी टास्किंग स्किल्समुळे पगारवाढ मिळेल. राजकारण्यांसाठी नवीन संपर्क फायदेशीर ठरणार आहे. 

वृषभ (Taurus Zodiac) 

तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. लक्ष्मीनारायण शुक्ल योगामुळे काम वेळेत पूर्ण होतील. रविवारी कुटुंबासोबत घालवलेला वेळ तुम्हाला मानसिक शांती देणार आहे. 

मिथुन (Gemini Zodiac)

परदेशातील संपर्कामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यवसायातील चढउतार तुमच्यासाठी अडचणीचा ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या विरोधकांमुळे तुमच्या कामात विलंब होणार आहे. कुटुंबातील नकारात्मक परिस्थिती तणावपूर्ण असणार आहे. 

कर्क (Cancer Zodiac)   

नोकरदार आणि बेरोजगारांना कठोर परिश्रम केल्यानंतर थोड यश मिळणार आहे. रविवारी कुटुंबासमवेत दूरच्या नातेवाईकाला भेट देण्यासाठी बेत ठरु शकतो. आरोग्याबाबत सावध राहावं लागेल. प्रेम आणि वैवाहिक जीवनात आनंद असेल. 

सिंह (Leo Zodiac) 

व्यवसायिकांना फायदा होणार आहे. तुमच्या सहकाऱ्यांना मदत केल्यामुळे अनेक अडचणी दूर होतील. नातेसंबंध मजबूत होतील कारण कुटुंबातील सर्वांशी तुमचं संबंध छान होणार आहेत. आरोग्याची काळजी घ्या. 

कन्या (Virgo Zodiac)   

व्यवसायात गुंतवणूक करण्याची योजना आखू शकता. बेरोजगार व्यक्तीला नोकरीच्या प्रयत्नात यश मिळणार आहे. रविवारी रोमान्स आणि उत्साहाने भरलेला असणार आहे. प्रवासात सावध राहा.

तूळ (Libra Zodiac)  

तुमचं कोणाशी भांडण होणार आहे. तुमची अपूर्ण कागदपत्रे आणि आळशीपणामुळे एखादं मोठं काम हाततून निसटणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक न झाल्याने तुम्ही नाराज राहणार आहात. कुटुंबात पैशांबाबत काही वाद होणार आहेत. 

वृश्चिक (Scorpio Zodiac)  

नवीन वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी मनाची तयारी करा. कारण कामाच्या ठिकाणी अनेक बदलांची माहिती मिळणार आहे. जोडीदारासोबत बाहेर जाण्याचे बेत आखाल. आरोग्याबाबत कमी जास्त तक्रारी असतील. 

धनु (Sagittarius Zodiac) 

तुम्हाला कर्जापासून मुक्ती मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी बढती मिळू शकते. कुटुंबातील सर्वजण तुमच्या कामात मदत करणार आहेत.

मकर (Capricorn Zodiac)  

व्यवसायात वेळ तुमच्या अनुकूल असल्यामुळे तुम्ही तुमच्या व्यवसायाची ओळख निर्माण करण्यात यशस्वी होणार आहात. एखाद्याकडून झालेली चूक तुम्ही विसराल आणि नातं नव्याने सुरु करणार आहात.  विद्यार्थ्यांनी वाईट कामात न अडकता अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे योग्य ठरेल. 

कुंभ (Aquarius Zodiac) 

 संघ आणि कर्मचाऱ्यांच्या आळसामुळे व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमचं विरोधक तुमची नकारात्मक प्रतिमा तयार करण्याचा कट रचणार आहेत. कुटुंबातील गैरसमज तुमचं नातं बिघडू शकतं. 

मीन (Pisces Zodiac) 

तुमच्या वडिलोपार्जित व्यवसायात तुमच्या कुटुंबातील सदस्यांचं सहकार्य तुमच्या डोक्यावरील ओझे कमी करणार ठरणार आहे. गुंतवणूक करण्याच्या विचारात असलेल्या व्यावसायिकांनी नियोजनबद्ध पद्धतीने गुंतवणूक करणं फायद्याचं ठरेल. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा आणि परिणामांची काळजी सोडून द्या. तुम्हाला तुमच्या प्रेम आणि जोडीदाराकडून काही चांगली बातमी मिळणार आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)