Horoscope 15 April 2024 : आठवड्याचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार आव्हानात्मक!

Horoscope 15 April 2024 : सोमवार हा भगवान शंकराची उपासना करण्याचा दिवस मानला जातो. आठवड्याचा पहिला दिवस आपल्यासाठी कसा असेल, कुठल्या गोष्टीची काळजी घ्यावी याबद्दल जाणून घ्या आजचं तुमचं राशीभविष्य 

नेहा चौधरी | Updated: Apr 15, 2024, 08:30 AM IST
Horoscope 15 April 2024 : आठवड्याचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार आव्हानात्मक! title=
daily rashi bhavishya daily horoscope today rashi bhavishya 15 april 2024

Rashi Bhavishya 15 April 2024 in Marathi : सोमवार म्हणजे आठवड्याची नवीन सुरुवात...असं म्हणतात की सुरुवात चांगली झाली की अख्खा आठवडा छान जातो. अशामध्ये आजचा दिवस तुमच्या करिअरसाठी, आरोग्यासाठी कसा असेल. तुमची आर्थिक गणिताशिवाय घरात कसं वातावरण असेल, जोडीदारासोबतच नातं खुलना की वाद होणार जाणून घ्या सोमवारचं म्हणजे आजचं राशीभविष्य ज्योतिषाचार्य प्रीतिका मोजुमदार यांच्याकडून

मेष (Aries Zodiac)  

आज मित्रांची वृत्ती तुम्हाला आनंदी देणार आहे. कर्जाची आवश्यकता असेल तर आज तुम्हाला ते मिळू शकतं. आज दुसऱ्यांच्या कामात ढवळाढवळ करु नका. तुम्हाला प्रेमाचे सकारात्मक संकेत मिळणार आहेत. कोणावरही विश्वास ठेवू नका. 

वृषभ (Taurus Zodiac) 

मुलांकडून आनंदाची बातमी मिळणार आहे. तुमच्या मेहनतीचं फळ मिळणार आहे. तुम्ही पाहिलेली स्वप्न पूर्ण होणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही सकारात्मक बदल दिसणार आहे. तुम्हाला तुमच्या उणिवांवर काम करावे लागणार आहे. तुमच्या जोडीदाराच्या खोट्या गोष्टीमुळे तुम्ही अस्वस्थ असणार आहात. 

मिथुन (Gemini Zodiac)

शेअर मार्केटमधील गुंतवणूक आर्थिक फटका देणारी ठरेल.  कुटुंबातील सदस्यांची मदत तुमच्यासाठी संजीवनीचं काम करणार आहे. वैयक्तिक मार्गदर्शनामुळे तुमचे नाते खुलणार आहे. आज एखादा दूरचा नातेवाईक अचानक घरी येणार आहे. वैवाहिक जीवनात परिस्थिती जरा सुधारेल. 

कर्क (Cancer Zodiac)   

आज आरोग्याशी संबंधित समस्या तुमच्यासाठी त्रासदायक ठरेल. आज घरातील गोष्टींवर पैसा खर्च होणार आहे. जुना मित्राच्या फोनमुळे जुन्या आठवणीने मन प्रसन्न होणार आहे. प्रेमाच्या मार्गात काही अडथळे येणार आहेत. तुमचा स्पर्धात्मक स्वभाव तुम्हाला इतरांपेक्षा पुढे ठेवण्यास मदतगार ठरणार आहे. 

सिंह (Leo Zodiac) 

आर्थिक समस्येचा सामना करावा लागू शकतो. घरामधील छोटे छोटे बदल तुम्हाला सकारात्मक उर्जा देतील. प्रेमाच्या जीवनात एक सुंदर अनुभव तुम्हाला मिळणार आहे. भरपूर सर्जनशीलता आणि उत्साह तुम्हाला दुसऱ्या लाभदायक दिवस घेऊन येणार आहे. 

कन्या (Virgo Zodiac)    

आज तुम्हाला ध्यान केल्याने आराम मिळणार आहे. दिवसाच्या दुसऱ्या भागात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. रोमँटिक आठवणी आज तुमच्यावर वर्चस्व गाजवणार आहे. तुमचे मन कामाशी संबंधित समस्यांमध्ये अडकून राहणार आहे. 

तूळ (Libra Zodiac)  

आज स्थावर मालमत्तेशी संबंधित गुंतवणूक तुम्हाला चांगला नफा देणारी ठरणार आहे. तुमची मुलं तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी जे काही करतील ते तुमच्यासाठी स्वर्गापेक्षा कमी नसेल. भरपूर काम असूनही आज तुमच्यामध्ये कामाच्या ठिकाणी ऊर्जा मिळणार आहे. आज तुम्ही दिलेले काम नियोजित वेळेपूर्वी पूर्ण करणार आहात. 

वृश्चिक (Scorpio Zodiac)   

आज तुमच्या वैयक्तिक समस्यांमुळे तुमची मानसिक शांतता बिघण्याची शक्यता आहे. मानसिक दबाव टाळण्यासाठी, काहीतरी मनोरंजक आणि चांगले वाचणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कामाच्या संदर्भात तुमच्यावर जबाबदारीचे ओझे वाढेल. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला काही चांगली बातमी कानावर पडणार आहे. 

धनु (Sagittarius Zodiac) 

आज तुमची उच्च पातळी चांगल्या कामात वापरल्यास फायदेशीर ठरणार आहे. जर तुम्ही दीर्घकाळ गुंतवणूक केली तर तुम्हाला लाभ होणार आहे. तुमची महत्त्वाकांक्षा तुम्हाला मदत करू शकणाऱ्या वडिलांसोबत शेअर करणे फायदेशीर ठरणार आहे. आज नशीब तुम्हाला नक्कीच साथ देणार आहे. वैवाहिक सुखाच्या दृष्टिकोनातून आज तुम्हाला काही अनोखी भेट मिळणार आहे. 

मकर (Capricorn Zodiac)   

आज एखादा मित्र तुमच्या सहनशीलतेची आणि समजूतदारपणाची परीक्षा घेणार आहे. व्यवसायात आज चांगला फायदा होणार आहे. आज तुम्ही तुमच्या व्यवसायाला नवीन उंचीवर नेणार आहात. नवीन रूप, नवीन कपडे, नवीन मित्र आजचा दिवस खास ठरणार आहे. 

कुंभ (Aquarius Zodiac) 

आर्थिक सुधारणेमुळे, आपण बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली बिले आणि कर्जाचा ओझा उतरणार आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत काही निवांत क्षण व्यतित करणार आहात. तुमचे थकलेले आणि दुःखी जीवन तुमच्या जीवन साथीदारावर ताण आणणारा ठरणार आहे. दिवसाची सुरुवात थोडी दमछाक करणारी असणार आहे. दिवसाच्या शेवटी, तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळेल आणि तुमच्या जवळच्या व्यक्तीला भेटून तुम्ही या वेळेचा सदुपयोग करणार आहात. 

मीन  (Pisces Zodiac) 

आज तुम्ही जे काही कराल, ते तुमच्यासाठी लागणाऱ्या निम्म्या वेळेत करणार आहात. गुंतवणूक कधी कधी तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. आजचा दिवस आनंदाने भरलेला असणार आहे. कारण तुमचा जीवनसाथी तुम्हाला आनंद देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहात. आवश्यकतेपेक्षा जास्त सैल खिसा बाळगणे टाळा. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)