Horoscope 17 october 2022 : आठवड्याची आणि दिवसाची सुरुवात झालीये. अवघ्या पाच दिवसांवर दिवाळीही येऊन उभी आहे. या अशा वातावरणात संपूर्ण माहोल सकारात्मक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मग यात, तुमचा संपूर्ण दिवसही मागे कसा बरं राहील... या नव्या आठवड्याची आणि नव्या दिवसाची सुरुवात करुया आजच्या राशीभविष्याने...
मेष (Aries Horoscope Today)
अडकलेले पैसे परत मिळणार आहेत. आज मन प्रसन्न असेल. व्यापारात गुंतवणूक करा. नोकरी करण्यासाठी एखादी नवी संधी चालून येईल.
वृषभ (Today Taurus Horoscope)
नोकरीच्या संधी मिळतील. जुन्या मित्रांना मिळण्यासाठी बेत आखाल. कोणाशीही वाद घालू नका.
मिथुन (Today Gemini Horoscope)
आईवडिलांच्या आशीर्वादाने शुभ कामांची सुरुवात करा. कुटुंबात आनंदी वातावरण असेल. आजची गुंतवणूक तुम्हाला फळणार आहे.
कर्क (Cancer Horoscope Today)
दाम्पत्य जीवनात आनंदाचे आणि सुखावणारे क्षण येणार आहेत. नवं वाहन खरेदी कराल. मानसन्मान वाढेल. कुटुंबासमवेत फिरायला जाण्याचे बेस आखाल.
सिंह (Leo Horoscope Today)
संध्याकाळपर्यंत एखादी शुभवार्ता कळेल. अविस्मरणीय आणि आश्चर्यकरक घटनेनं तुम्हीही थक्क व्हाल. अडकलेले पैसे परत मिळतील.
कन्या (Horoscope Virgo Today)
तुमच्या कामावर लक्ष द्या. अचानक एखादी इजा होऊ शकते. जोडीदारासोबत निवांत क्षण व्यतीत करा.
तुळ (Libra Horoscope Today)
नवी भेट मिळणार आहे. संतानसुख मिळणार आहे. पुत्रप्राप्तीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना आज गोड बातमी मिळणार आहे. कुटुंबात विनाकारण वाद घालू नका.
वृश्चिक (Scorpio Horoscope Today)
परदेशात प्रवास करण्याचा योग आहे. आज जवळच्या व्यक्तीवर प्रेम व्यक्त करा. रागावर नियंत्रण ठेवा.
धनु (Sagittarius Horoscope Today)
आज तुमचे सर्व प्रयत्न ठरणार आहेत. आजचा दिवस तुमचाच आहे. नोकरी बदलण्याचा विचार कराल. खर्च आणि अर्थार्जन दोन्ही वाढेल.
मकर (Today Capricorn Horoscope)
आज कुटुंबीयांना वेळ द्या, त्यातूनच अर्ध्या अडचणी दूर होणार आहेत. नात्यांमध्ये असणारी कटुता संपणार आहे.
कुंभ (Today Aquarius Horoscope)
अडकलेली कामं मार्गी लागणार आहेत. नोकरीतील समस्या दूर होतील. आई- वडिलांमध्ये असणारे वाद मिटतील.
मीन (Pisces Horoscope Today)
मोठ्यांचा आदर करा. वाहन लक्षपूर्वक चालवा. नातेसंबंधांमध्ये आलेली कटुता दूर करण्यावर भर द्या.