Chaturgrahi Yog on Hanuman Jayanti 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि नक्षत्र यांना अतिशय महत्त्व आहे. या ग्रह गोचरमुळे कधी शुभ तर कधी अशुभ योग निर्माण होत असतात. एका विशिष्ट कालावधीनंतर एक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. हे ग्रह 12 राशीतून भ्रमण करत असतात. अशात एका राशीत अनेक वेळा एकापेक्षा जास्त ग्रहांचं मिलन होत असतं. यातून काही योग निर्माण होतात.
हनुमान जयंतीला मीन राशीत चार ग्रहांचा संयोग होणार आहे. धनाचा दाता शुक्र, बुद्धीचा दाता बुध, व्यापार देणारा मायावी ग्रह राहू मीन राशीत आहेत. त्यात आता हनुमान जयंतीला 23 एप्रिल मंगळवारी ग्रहांचा सेनापती मंगळ मीन राशीत गोचर करणार आहे. यामुळे मीन राशीमध्ये चतुर्ग्रही योग निर्माण करणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर होणार आहे. मात्र 3 राशीची लोकांवर हनुमानजी विशेष कृपा बरसणार आहे. (Chaturgrahi Yog After 100 Years money and promotion with benefits for these zodiac signs)
चतुर्ग्रही योग तुमच्या कुंडलीतील पैशांच्या घरात तयार होत असल्याने हा तुमच्यासाठी भाग्यशाली ठरणार आहे. या योगामुळे तुमचं बँक बॅलेनेस वाढणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत गवसणार आहे. व्यवसायिकांनीही फायदा होणार आहे. त्यांच्या समस्या दूर होणार आहेत. एवढंच नाही तर तुम्हाला या काळात गुंतवणुकीतून चांगला नफा मिळणार आहे. तुमचा आत्मविश्वासही वाढ होणार आहे. तुम्ही तणावपूर्ण परिस्थितीला धैर्याने सामोरे जाणार आहात.
चतुर्ग्रही योग तुमच्या कुंडलीतील कर्म घरात निर्माण होणार असल्याने तो तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे. या योगामुळे तुमच्या कार्यक्षेत्रात आणि व्यवसायात अच्छे दिन येणार आहेत. सरकारी नोकसीसाठी परीक्षा देणाऱ्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळणार आहे. तुम्हाला सरकारी नोकरी मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे. नोकरदार लोकांना प्रमोशन मिळणार आहे. व्यावसायिकांना या योगाचा चांगला फायदा मिळणार आहे.
चतुर्ग्रही योग तुमच्या कुंडलीतील नवव्या घरात निर्माण होणार आहे. या योगामुळे तुम्हाला नशीबाची साथ मिळणार आहे. कुटुंबातील सदस्यांमुळे परस्पर समन्वय आणि आनंदी वातावरण असणार आहे. प्रवास घडणार आहे जो तुमच्यासाठी हिताचा ठरणार आहे. धार्मिक किंवा शुभ कार्यात सहभागी होणार आहे. आर्थिक स्थिती सुधारणार आहे. मेहनतीने उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)