Gajkesari Yog: दोन दिवस मीन राशीत गुरु आणि चंद्राची युती, गजकेसरी योगामुळे या राशींना मिळणार अपेक्षित फळ

11 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 2 वाजून 23 मिनिटांनी चंद्र ग्रहाने मीन राशीत प्रवेश केला आहे.

Updated: Sep 11, 2022, 05:22 PM IST
Gajkesari Yog: दोन दिवस मीन राशीत गुरु आणि चंद्राची युती, गजकेसरी योगामुळे या राशींना मिळणार अपेक्षित फळ title=

Gajkesari Yog In Meen Rashi: राशीचक्रात ग्रहमंडळाचं भ्रमण सर्वात महत्त्वाचं असतं. प्रत्येक ग्रहांचं भ्रमण कालावधी वेगवेगळा असतो. ज्योतिषशास्त्रात चंद्र हा नवग्रहांपैकी एक आहे. ज्योतिषशास्त्रात चंद्र हा सर्वात वेगाने राशी बदलणारा ग्रह आहे. चंद्र दर सव्वा दोन दिवसांनी राशी बदल करत असतो. त्यामुळे या ग्रहाचा प्रत्येक राशीवर त्या त्या गोचरानुसार परिणाम होत असतो. हा परिणाम अल्प कालावधीसाठी असला तरी महत्त्वाच्या कामात ऐन मोक्याच्या वेळी अडचणीचा ठरू शकतो. कधी कधी एकाच राशीत दोन ग्रह एकत्र आल्याने विचित्र योग तयार होतात. काही योग शुभ तर काही योग अशुभ असतात. त्याप्रमाणे गोचराचे परिणाम होत असतात.  

11 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 2 वाजून 23 मिनिटांनी चंद्र ग्रहाने मीन राशीत प्रवेश केला आहे. यामुळे मीन राशीत गजकेसरी योग तयार झाला आहे. मीन राशीत या आधीच वर्षभरासाठी गुरु ग्रहानं आगमन केलं आहे. मीन ही गुरु ग्रहाची स्वरास आहे. त्यामुळे गुरु ग्रह स्वत:च्या राशीत आहे. तर चंद्राने गोचर करत या राशीत प्रवेश केला आहे. गुरु आणि चंद्राच्या युतीमुळे या राशीत गजकेसरी योग तयार झाला आहे. 

गजकेसरी योग हा अतिशय शुभ योग मानला जातो आणि कुंडलीत तयार झालेल्या सर्व धन योगांपैकी हा सर्वात शक्तिशाली योग आहे. धनाचा कारक बृहस्पति आणि मनाचा कारक चंद्र यामुळे हा योग तयार होतो. हा योग कुंभ राशीच्या दुसऱ्या , मिथुन राशीच्या दहाव्या आणि वृषभ राशीच्या अकराव्या स्थानात तयार होत आहे. त्यामुळे या तीन राशींना चांगला फायदा होईल.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)