Budh Vakri 2022: वक्री बुध ग्रहामुळे कन्या राशीत भद्र योग, तीन राशींना मिळणार अशी फळं

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजकुमार अशी उपाधी असलेला बुध ग्रह 10 सप्टेंबरपासून कन्या राशीत वक्री झाला आहे. 23 दिवस बुध ग्रह या स्थितीत असणार आहे. 

Updated: Sep 11, 2022, 01:58 PM IST
Budh Vakri 2022: वक्री बुध ग्रहामुळे कन्या राशीत भद्र योग, तीन राशींना मिळणार अशी फळं title=

Budh Vakri Gochar 2022: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजकुमार अशी उपाधी असलेला बुध ग्रह 10 सप्टेंबरपासून कन्या राशीत वक्री झाला आहे. 23 दिवस बुध ग्रह या स्थितीत असणार आहे. म्हणजेच 2 ऑक्टोबरपर्यंत कन्या राशीत वक्री असणार आहे. त्यामुळे सर्वाधिक प्रभाव या राशीच्या लोकांवर पडेल.  बुध ग्रहाच्या वक्री स्थितीमुळे काही राशींना शुभ, तर काही राशींना अशुभ फळ भोगावी लागतील. बुध कन्या राशीत वक्री झाल्याने भद्र योग तयार होत आहे. जेव्हा बुध, मंगळ, गुरू, शुक्र आणि शनि हे ग्रह आपल्या राशींमध्ये केंद्रस्थानी उच्च स्थानावर असतात तेव्हा योग तयार होतो.

कन्या: बुध कन्या राशीत वक्री झाला आहे. त्यामुळे या राशीत भद्र योगही तयार होत आहे.  कन्या राशीच्या लोकांची करिअरमध्ये प्रगती होईल. या काळात तुमची सर्व कामे होतील. व्यवसायात अधिक लाभ होईल. मान-प्रतिष्ठेत वाढ होईल. भद्र योगामुळे हे लोक कार्यक्षम रणनीती बनवण्यात यशस्वी होतील. 

मकर : मकर राशीच्या लोकांसाठी बुधाची वक्री स्थिती अत्यंत शुभ राहील.  या काळात कुटुंबाच्या सुख-समृद्धीमध्ये वाढ होईल. धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. जर तुम्हाला काही मोठे काम सुरू करायचे असेल तर हा काळ खूप चांगला आहे. या दरम्यान तुम्हाला सर्व कामांमध्ये यश मिळेल. 

मीन : मीन राशीच्या लोकांसाठी बुध वक्रदृष्टी शुभ राहील. या काळात वैवाहिक जीवन आनंदी राहील. जे लोक विवाहासाठी पात्र आहेत, त्यांना स्थळ येऊ शकतात. नोकरीत प्रमोशन मिळू शकते.

(Disclaimer:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)