Chandra Grahan 2023 : या वर्षातील पहिले चंद्रग्रहण मे महिन्यात दिसणार आहे. याचा 12 राशींपैकी काही लोकांना लाभ होणार आहे. त्यांच्यासाठी एका महिन्यानंतर अच्छे दिन असणार आहेत. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या अतिशय खास खगोलीय घटना आहेत. त्याचबरोबर धर्म आणि वैदिक ज्योतिषात ग्रहण खूप महत्वाचे मानले जाते. चंद्र आणि सूर्यग्रहण वेळोवेळी घडतात आणि त्यांचे सर्व स्थानिकांवर वेगवेगळे परिणाम होतात.
2023 वर्षातील पहिले चंद्रग्रहण 5 मे रोजी रात्री 8.44 वाजता सुरु होईल आणि पहाटे 1 वाजता संपेल. 4 तासांपेक्षा जास्त काळ राहणारे ग्रहण भारतात दिसणार नाही, परंतु लोकांच्या जीवनावर त्याचा चांगला किंवा वाईट परिणाम होईल. दुसरीकडे, हे चंद्रग्रहण तीन राशीच्या लोकांसाठी चांगले असणार आहे. त्यामुळे त्यांच्यात सकारात्मक परिणाम दिसून येईल.
मेष : मे महिन्यात दिसणाऱ्या चंद्रग्रहणाचा मेष राशीच्या लोकांंवर परिणाम जाणावणार आहे. हा चांगला परिणाम असणार आहे. या राशींच्या लोकांसाठी चंद्रग्रहण खूप शुभ राहील. चंद्रग्रहणाच्या काळात चंद्राची शक्ती कमी आणि सूर्याचा प्रभाव वाढतो. यामुळे मेष राशीच्या लोकांचा एखाद्या गोष्टीवरील फोकस वाढेल. कामात कामगिरी चांगली राहील. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तसेच व्यवसायात वाढीबरोबर नफा जास्त होईल.
सिंह : 2023 वर्षातील पहिले चंद्रग्रहण सिंह राशीच्या लोकांसाठी लाभदायक आहे. तुमची अडकलेली कामे सुटण्यास मदत होईल. तसेच कोणत्याही महत्त्वाच्या कामात यश मिळू शकते. नवीन काम सुरु करू शकाल. तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकते. सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे आणि यावेळी सूर्याचा प्रभाव वाढेल, ज्यामुळे तुम्हाला शुभ परिणाम मिळतील.
मकर : या राशीच्या लोकांची त्यांच्या करिअरमध्ये प्रगती होईल. पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. प्रमोशन मिळण्याची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा पूर्ण होऊ शकते. आर्थिक उत्पन्नात वाढ होईल. अचानक धनलाभ आणि पैसा मिळू शकतो, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तुम्ही नवीन घर किंवा वाहन देखील खरेदी करु शकाल. या चंद्रग्रहणामुळे व्यापाऱ्यांनाही फायदा होईल. व्यवसायात वाढ होईल. 5 मे नंतर तुम्ही कोणतेही नवीन काम सुरु करु शकता.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)