Chandra Grahan Effects On All Zodiac : 2022 वर्ष संपायला आता महिना राहिला आहे. अशात या वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण 8 नोव्हेंबर म्हणजे उद्या मंगळवारी होणार आहे. यंदा चंद्रग्रहणावर शनि-मंगळाचा षडाष्टक योग तयार होत आहेत. त्यामुळे या चंद्रग्रहणाचा अनेक राशींवर विपरीत परिणाम दिसून येणार आहे. त्यामुळे चंद्रग्रहणावर लोकांना सावधगिरी बाळगावी लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक राशींने काही उपाय केल्यास त्यांचावर या चंद्रग्रहणाचा परिणाम जाणवणार नाही. चला तर मग जाणून घेऊयात ज्योतिषशास्त्रानुसार कुठल्या राशीला कुठले उपाय करायचे आहे. (chandra grahan 2022 Effects On All Zodiac Remedies Lunar eclipse date and time november 2022 Yog nmp )
मेष : मानसिक तणाव राहील. साखरमिश्रित पाण्याने चंद्राला अर्घ्य अर्पण करावे.
वृषभ : डोळ्यांचा त्रास होईल. मिठाचे सेवन कमी करा.
मिथुन: पैशाशी संबंधित समस्या असू शकतात. कच्च्या दुधाने महादेवाचा अभिषेक.
कर्क : शारीरिक समस्या असू शकतात. 'ओम सोमय नमः' चा जप करा.
सिंह: रोगांवर पैसा खर्च वाढेल, 'नमः शिवाय' चा जप करा.
कन्या : पैसे मिळण्यात अडचणी येतील. शिवलिंगावर चिमूटभर तांदूळ अर्पण करा.
तूळ : नोकरीत त्रास होईल. शिव चालिसा पठण करा.
वृश्चिक : वडिलांची तब्येत बिघडू शकते. चांदीच्या भांड्यातून पाणी प्या.
धनु : सासरच्यांशी संबंध बिघडू शकतात. अन्न आणि वस्त्र दान करा.
मकर:व्यवसायात अडचणी वाढू शकतात. चंद्र स्तोत्राचा पाठ करा.
कुंभ : गुप्त शत्रू तुम्हाला त्रास देतील. शिवाष्टकांचे पठण करावे.
मीन : प्रेमप्रकरणात अडचणी येतील. मोती परिधान करा.
भारतीय वेळेनुसार : दुपारी 2:41 ते संध्याकाळी 6:18.
भारतातील कधी दिसणार : संध्याकाळी 5:32 ते संध्याकाळी 6:18.
सुतक काल : 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 8.20 पासून प्रारंभ होईल.
ज्योतिषांच्या मते, यावेळी चंद्रग्रहण आंशिक असेल आणि भारतासह काही देशांमध्येच ते पाहता येईल. या काळात कोणत्याही प्रकारचे शुभ किंवा धार्मिक कार्य करण्यास मनाई असेल. या दिवशी मंगळ, शनि ग्रह, सूर्य ग्रह आणि राहू एकमेकांना सामोरे जातील. यासोबतच तुला राशीवर चंद्र, बुध, सूर्य आणि शुक्राचा विनाशकारी योग तयार होत आहे. त्यामुळे या चंद्रग्रहण काळात सर्व लोकांनी सतर्क राहून विशेष उपाय योजण्याची गरज आहे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)