Chandra Gochar 2022: पुढचे दोन दिवस मकर राशीत विष योग, या राशींनी जरा सांभाळूनच

ज्योतिषशास्त्रीय ग्रंथांमध्ये या योगाबद्दल दोन्ही प्रकारचे परिणाम सांगितले आहेत.

Updated: Sep 6, 2022, 01:49 PM IST
Chandra Gochar 2022: पुढचे दोन दिवस मकर राशीत विष योग, या राशींनी जरा सांभाळूनच title=

Chandra Gochar On 6th September 2022: ज्योतिषशास्त्रानुसार नऊ ग्रह ठराविक कालावधीनंतर राशी बदल करत असतात. या बदलामुळे 12 राशींवर परिणाम होत असतो. त्यामुळे ग्रहांच्या गोचराकडे ज्योतिष्यांचं लक्ष लागून असतं. काही ग्रह दीर्घ कालावाधीनंतर, तर काही ग्रह लगेच राशी बदल करतात. चंद्र ग्रह दर सव्वा दोन दिवसांनी राशी बदल करत असतो. त्यामुळे या ग्रहाच्या गोचराचे परिणाम अगदी थोड्या कालावधीसाठी असतो. चंद्र ग्रह आज रात्री म्हणजेच 6 सप्टेंबर 2022 रोजी रात्री 11 वाजून 38 मिनिटांनी धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे. पण मकर राशीत शनि वक्री होऊन आधीच विराजमान आहे. त्यामुळे पुढील सव्वा दोन दिवस म्हणजेच 9 सप्टेंबर 2022 रोजी 12 वाजून 39 मिनिटांपर्यंत या राशीत विष योग तयार झाला आहे. यामुळे काही राशींना शुभ तर काही अशुभ परिणाम जाणवतील. 

सूर्यानंतर चंद्र हा आकाशातील सर्वात तेजस्वी ग्रह आहे. वैदिक ज्योतिषात चंद्राला मनाचा कारक मानला जातो. चंद्राच्या प्रभावामुळे व्यक्तीचे मन अशांत किंवा स्थिर होते. मनुष्याचे मनावर नियंत्रण असेल तर सगळं सहज शक्य होतं, पण मन अस्थिर असेल तर काम व्यवस्थित होत नाही. एकूणच कामात अनेक अडचणी येतात. ज्योतिषशास्त्रीय ग्रंथांमध्ये या योगाबद्दल दोन्ही प्रकारचे परिणाम सांगितले आहेत. पण याला अशुभ योगाच्या श्रेणीत ठेवले आहे.

  • मकर रास- विष योग पहिल्या स्थानात
  • धनु रास- विष योग दुसऱ्या स्थानात
  • वृश्चिक रास- विष योग तिसऱ्या स्थानात
  • तूळ रास- विष योग चौथ्या स्थानात
  • कन्या रास- विष योग पाचव्या स्थानात
  • सिंह रास- विष योग सहाव्या स्थानात
  • कर्क रास- विष योग सातव्या स्थानात
  • मिथुन रास- विष योग आठव्या स्थानात
  • वृषभ रास- विष योग नवव्या स्थानात
  • मेष रास- विष योग दहाव्या स्थानात
  • मीन रास- विष योग अकराव्या स्थानात
  • कुंभ रास- विष योग बाराव्या स्थानात

सव्वा दोन दिवसांच्या कालावधीत धनु, मेष आमि मीन राशीच्या लोकांना सावधपणे व्यवहार करणं आवश्यक आहे. कारण या राशींच्या दुसऱ्या, दहाव्या आणि अकराव्या स्थानात हा योग तयार होत आहे. या काळात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसेच दिलेले पैसे अडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन दिवस धनु, मेष आणि मीन राशीच्या सांभाळून राहणं आवश्यक आहे.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)