Chanakya Niti: चाणक्य नीतीनुसार (Chanakya Niti), काही पुरुषांमध्ये (Mens Habit) अशा काही सवयी असतात, ज्या महिलांना प्रचंड आवडतात. अशा पुरुषांकडे स्त्रिया सहजरित्या आकर्षित होतात. चाणक्यांच्या म्हणण्याप्रमाणे, पुरुषांच्या व्यक्तिमत्त्वाशी निगडीत या गोष्टी महिलांना इतक्या आवडतात, की त्या पुरुषांकडे आकर्षित होतात. तर दुसरीकडे ज्या पुरुषांमध्ये अशा सवयी नसतात, ते इतर पुरुषांशी जळतात.
अशा कोणत्या सवयी आहेत, ज्या महिलांना आकर्षित करतात, जाणून घेऊया.
आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्याप्रमाणे, जे पुरूष दुसऱ्यांना मान, सन्मान देणं जाणतो, महिला त्यांच्याकडे सहतेने आकर्षित होतात. जे पुरुष प्रेम संबंध किंवा वैवाहिक संबंधांमध्ये कोणाचा आदर करत नाहीत तसंच दुसऱ्यांना दुखावतात, त्यांचाविषयी महिलांच्या मनात तिरस्कार असतो.
आचार्य चाणक्य म्हणतात की, एखाद्या महिलेने जर पुरुषाला सिक्रेट सांगितलं आणि त्यानंतर त्या पुरुषाने ते केवळ स्वतःपुरता सीमित ठेवलं, तर ही गोष्ट महिलांना आवडते. जर पुरुषांनी प्रेमसंबंधांमध्ये महिलांवर कोणतीही बंधनं घातली नाहीत, तर त्यांचं नातं कधीच फिस्कटत नाही.
जेव्हा एखादा महिलेला पुरुष उपस्थित असताना सुरक्षित वाटतं, तेव्हा स्त्रिया अशा पुरुषावर विश्वास ठेवतात. ज्या नात्यामध्ये चांगलं वातावरण असं तिथे प्रेमाची कधीच कमतरता नसते.
जे पुरुष घमेंडी नसतात किंवा इगो सोडून ते स्त्रियांचा विचार करतात, अशा पुरुषांकडेही स्त्रिया आकर्षित होताना दिसतात. एखादा पुरुष जर स्वतःहून त्याने केलेली चूक स्विकारत असेल, तर महिलांना त्याची ही सवय प्रचंड आवडते. यामुळे नात्यांमध्ये आनंद देखील निर्माण होतो.