Anuradha Nakshatra: शनिच्या नक्षत्रात 3 ग्रहांच्या युतीमुळे शुभ योग, या राशींना मिळणार बळ

Three Grah Yuti In Anuradha Nakshatra: ज्योतिषशास्त्रात ग्रह गोचर आणि नक्षत्रांचं वेगळं असं महत्त्व आहे. नऊ ग्रह आणि 27 नक्षत्रांचा 12 राशींवर प्रभाव पडतो. अनुराधा नक्षत्र हे शनिदेवांचं मानलं जातं. या नक्षत्रात तीन ग्रहांची युती झाली आहे. 

Updated: Dec 1, 2022, 12:25 PM IST
Anuradha Nakshatra: शनिच्या नक्षत्रात 3 ग्रहांच्या युतीमुळे शुभ योग, या राशींना मिळणार बळ title=

Three Grah Yuti In Anuradha Nakshatra: ज्योतिषशास्त्रात ग्रह गोचर आणि नक्षत्रांचं वेगळं असं महत्त्व आहे. नऊ ग्रह आणि 27 नक्षत्रांचा 12 राशींवर प्रभाव पडतो. अनुराधा नक्षत्र हे शनिदेवांचं मानलं जातं. या नक्षत्रात तीन ग्रहांची युती झाली आहे. सूर्य (Surya), बुध (Budh) आणि शुक्र (Shukra) हे तीन ग्रह अनुराधा नक्षत्रात (Anuradha Nakshatra) एकत्र आले आहेत. यामुळे शुभ योग तयार झाला आहे. या शुभ योगाचा प्रभाव 12 राशींवर असणार आहे. पण तीन राशी अशा आहेत की त्यांना या युतीची चांगली फळं मिळतील. 

मकर (Makar)- अनुराधा नक्षत्रात बुध, सूर्य आणि शुक्र युतीचा मकर राशींला जबरदस्त फायदा होणार आहे. तीन ग्रहांची युती या राशीसाठी शुभ फळ देणार आहे. या दरम्यान नशिबाची पूर्ण साथ मिळेल. नोकरदार आणि उद्योगपतींना अप्रत्यक्षरित्या लाभ मिळेल. अडकलेली कामं या काळात पूर्ण होतील. तसेच खर्चावर आळा घालण्यात यश मिळेल.

कर्क (Kark)- तीन राशींच्या युतीमुळे कर्क राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. आर्थिक स्थिती या काळात सुधारेल. स्पर्धा परीक्षा आणि सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्यांना शुभ बातमी मिळेल. प्रॉपर्टीत गुंतवणूक करणं फायदेशीर ठरेल. 

बातमी वाचा- Astro Tips: एक रुपयाच्या नाण्यामुळे तुमचं भाग्य उजळेल! काय सांगतं ज्योतिषशास्त्र जाणून घ्या

कुंभ (Kumbh)- अनुराधा हे शनिचं नक्षत्र असून कुंभ राशीचा अधिपती शनि आहे. यामुळे या नक्षत्रात तीन ग्रहांची युती शुभ असेल. वैवाहिक जीवनातील कलह दूर होतील. जोडीदाराकडून साथ मिळेल. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली काम मार्गी लागतील. या काळात आर्थिक स्थिती सुधारेल.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)