Budh Gochar 2022 In Vruschik Rashi: ज्योतिषशास्त्रात ग्रहांचं गोचर महत्त्वपूर्ण मानलं गेलं आहे. प्रत्येक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो. ग्रह त्यांच्या स्वभावानुसार गोचर फळ देत असतात. वैदिक ज्योतिषशास्त्रात बुधाला ग्रहांचा राजकुमार म्हंटलं जातं. बुध ग्रह बुद्धि, धन, व्यापार आणि संवाद यावर अधिपत्य गाजवणारा ग्रह आहे. 14 नोव्हेंबरला बुध ग्रहाने (Budh Grah Gochar) वृश्चिक राशीत प्रवेश केला आहे. या गोचराचा काही राशींवर शुभ परिणाम जाणवणार आहे. चला जाणून घेऊयात शुभ परिणाम असलेले राशी कोणत्या आहेत
कर्क (Kark)- बुध ग्रहाने तूळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे या राशीला चांगले दिवस येणार आहेत. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. तसेच पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यापाऱ्यात धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच शुभ समाचार मिळू शकतो.
कन्या (Kanya)-या राशीसाठी बुध ग्रहाचा गोचर उत्साह वाढवणारा असणार आहे. हातात घेतलेल्या कामात यश मिळेल. तसेच विदेश यात्रेवर जाण्याचा योग जुळून येईल. वैवाहिक जीवनात आनंद मिळेल.
वृश्चिक (Vrushchik)- बुध गोचरामुळे या राशीसाठी चांगले दिवस घेऊन येणार आहे. या राशीतच बुध ग्रहाने गोचर केला आहे. या राशीच्या लोकांना व्यवसायात लाभ मिळेल. तसेच उत्पन्नात वाढ होईल. तसेच कुटुंबात आनंदी वातावरण राहील.
Dream Science: अशी स्वप्न देतात भविष्याबाबत शुभ संकेत, नेमका अर्थ काय? जाणून घ्या
मीन (Meen)- बुध राशीच्या गोचरामुळे मीन राशीला नशिबाची साथ मिळेल. अडकलेली कामं मार्गस्थ लागतील. करिअरमध्ये मोठा लाभ होईल. हा काळ लग्न जमण्यासाठी अनुकूळ आहे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)