Budh Grah Margi: पाच दिवसानंतर बुध ग्रह होणार मार्गस्थ, 'या' राशींसाठी अच्छे दिन!

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका कालावधीनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. या बदलाचा राशीचक्रातील 12 राशींवर शुभ-अशुभ परिणाम होतो. 

Updated: Sep 28, 2022, 04:21 PM IST
Budh Grah Margi: पाच दिवसानंतर बुध ग्रह होणार मार्गस्थ, 'या' राशींसाठी अच्छे दिन! title=

Budh Grah Margi: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका कालावधीनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. या बदलाचा राशीचक्रातील 12 राशींवर शुभ-अशुभ परिणाम होतो. पाच दिवसानंतर म्हणजेच 2 ऑक्टोबरला बुध ग्रह मार्गस्थ (Budh Grah) होणार आहे. 10 सप्टेंबरला वक्री अवस्थेतच बुध ग्रहाने कन्या राशीत प्रवेश केला होता. त्यामुळे आता मार्गी होणार असल्याने तीन राशींसाठी चांगले दिवस असणार आहेत. चला तर जाणून घेऊयात तीन राशी कोणत्या आहेत. 

धनु: बुध मार्गी होत असल्यामुळे तुमच्यासाठी हा काळ चांगला असणार आहे. नवीन नोकरीची ऑफर मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला प्रमोशन आणि इन्क्रीमेंट देखील मिळू शकते. या काळात व्यवसायाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. कामाच्या संदर्भात तुम्ही प्रवास करू शकता. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. सहकारी आणि अधिकारी तुमच्या कामाची प्रशंसा करतील.

वृश्चिक: तुमच्या घरात धार्मिक कार्यक्रम होऊ शकतात. जोडीदारासोबतच्या नात्यात गोडवा राहील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. घरात अडकलेली अनेक कामे पूर्ण होतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. शेअर बाजार, लॉटरी किंवा इतर मार्गांनी तुम्हाला अचानक फायदा होऊ शकतो. व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही नवीन प्रयोग कराल, ज्याचा तुम्हाला खूप फायदा होईल.

Vastu Tips: घरावर पिंपळ वृक्ष उगवणं असतं अशुभ, लगेच उचला असं पाऊल

सिंह: बुध ग्रहाचं मार्गक्रमण तुम्हाला न्यायालयीन खटल्यांपासून मुक्ती देऊ शकेल. भागीदारीत नवीन व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेऊ शकता. शिक्षक, वकील, मार्केटिंग तज्ज्ञ अशा क्षेत्रात असणाऱ्या लोकांसाठी हा काळ चांगला राहील. तुमच्या वकृत्वामुळे तुम्हाला या क्षेत्रात यश मिळेल. गुंतवणूक करताना काळजी घ्या. व्यवसायात एखादी मोठी डील फायनल होऊ शकते.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)