Budh Gochar 2023: बुध गोचरामुळे तयार होणार भद्र राजयोग, काय असतं फलित जाणून घ्या

Budh Gochar 2023 In Makar Rashi: न्यायदेवता शनि महाराजांनी राशी बदल केल्यानंतर बऱ्याच घडामोडी घडतील असा अंदाज ज्योतिषशास्त्र जाणकारांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे आता राजकुमाराचा दर्जा असलेला बुध ग्रह राशी परिवर्तन करणार आहे. यामुळे राशीचक्रातील 12 राशींवर परिणाम होणार आहे.

Updated: Jan 18, 2023, 01:21 PM IST
Budh Gochar 2023: बुध गोचरामुळे तयार होणार भद्र राजयोग, काय असतं फलित जाणून घ्या title=

Budh Gochar 2023 In Makar Rashi: न्यायदेवता शनि महाराजांनी राशी बदल केल्यानंतर बऱ्याच घडामोडी घडतील असा अंदाज ज्योतिषशास्त्र जाणकारांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे आता राजकुमाराचा दर्जा असलेला बुध ग्रह राशी परिवर्तन करणार आहे. यामुळे राशीचक्रातील 12 राशींवर परिणाम होणार आहे. बुध ग्रह 7 फेब्रुवारीला धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे. 27 फेब्रुवारीपर्यंत बुध ग्रह या राशीत असणार आहे.  या गोचरामुळे भद्र राजयोग तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा शुभ योग असून काही राशींसाठी हा काळ अनुकूल असणार आहे. चला जाणून घेऊयात या स्थितीचा कोणकोणत्या राशींना लाभ मिळेल.

मेष- बुध ग्रह राशी परिवर्तन करणार असल्याने या राशीच्या जातकांना फायदा होईल. भद्र राजयोगामुळे अडकलेली कामं पूर्ण होतील. शिक्षण आणि करिअरमध्ये प्रगती दिसून येईल. तसेच आर्थिक स्थिती या काळात सुधारेल. 

मिथुन- बुध गोचरामुळे मिथुन राशीच्या लोकांना शुभ फळ मिळेल. ग्रहमानामुळे नशिब चमकेल, तसेच भागीदारीच्या धंद्यात चांगला परतावा मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती आणि पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. अविवाहित लोकांचा या काळात लग्न जमू शकतं. 

कन्या- भद्र राययोगामुळे कन्या राशीच्या लोकांना बळ मिळेल. नशिबाची साथ मिळणार असल्याने अडकलेली कामं पूर्ण होतील. हात घालाल त्या कामात यश मिळेल. असं असलं तरी आवाका पाहूनच कामं हाती घ्या. या काळात कौटुंबिक वातावरण चांगलं असणार आहे.

बातमी वाचा- Shani Gochar 2023: कुंभ राशीतील शनिचं गुरु ग्रहासोबत अनोखं नातं, अखंड साम्राज्य योगामुळे तीन राशींची चांदी

धनु- या राशीच्या लोकांना नुकताच साडेसातीतून दिलासा मिळाला आहे. त्यात भद्र राजयोगामुळे सोन्याहून पिवळं होणार आहे. साडेसात वर्षे शनिच्या अधिपत्याखाली घालवल्याने आता दिलासा मिळेल. अडकलेली कामं पूर्ण होतील. तसेच उद्योगात चांगला परतावा मिळेल. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)