Shani Vakri 2023 : 4 दिवसांनी 'या' लोकांच्या आयुष्यात येणार मोठे वादळ, शनी बरोबर राहू-केतू होणार वक्री

Shani Rahu Ketu Vakri 2023 : अनेकांना शनी साडेसाती तसेच शनी पिडा याची भीती वाटत असते. सर्व ग्रहांमध्ये शनी हा सर्वात संथ गतीचा ग्रह मानला जातो. 2023 च्या सुरुवातीला म्हणजे 17 जानेवारीलाच शनीने स्वत:च्या राशीने 30 वर्षांनी कुंभ राशीत प्रवेश केला आहे आणि 17 जून रोजी शनी कुंभ राशीत वक्री होणार आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

Updated: Jun 16, 2023, 08:33 AM IST
Shani Vakri 2023 : 4 दिवसांनी 'या' लोकांच्या आयुष्यात येणार मोठे वादळ, शनी बरोबर राहू-केतू होणार वक्री   title=
Shani Rahu Ketu Vakri 2023, Saturn Retrograde 2023

Shani Vakri 2023 : शनी वक्री होत असल्याने काही राशीच्या लोकांना संभाळून राहावे लागणार आहे. शनी बरोबर राहू-केतू हेही वक्री होणार आहे. 17 जून रोजी शनी कुंभ राशीत वक्री होणार आहे. आणि राहू-केतू शनीच्या सहवासात वक्री होतील. त्याचा प्रभाव विशेषतः या 4 राशींवर दिसून येईल. ज्योतिष शास्त्रानुसार, शनिवार, 17 जून रोजी शनी कुंभ राशीत वक्री होत आहे. त्यामुळे शनी स्वतःच्या राशीत सहा महिने मागे जात आहे. अशा स्थितीत शनिबरोबरच इतर दोन ग्रह ऑक्टोबरपर्यंत वक्री होतील. येत्या 6 महिन्यात 3 ग्रहांची वक्री चाल होणार आहे. ग्रहांच्या या वक्री चालीचा प्रभाव विशेषतः सिंह राशीसह या 4 राशींवर दिसून येईल. या लोकांना आरोग्य, करिअर आणि आर्थिक बाबतीत खूप काळजी घ्यावी लागेल. 

कर्क 

शनिसोबत राहू-केतूच्या वक्री चाल होणार असल्याने कर्क राशीच्या लोकांना पुढील 6 महिने त्यांच्या करिअरची तसेच आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल, असे ज्योतिष शास्त्रानुसार सांगण्यात आले आहे. एवढेच नाही तर या राशीच्या लोकांसाठी आर्थिक बाबीही त्रासदायक राहतील. ज्या लोकांवर कर्ज आहे किंवा कर्ज घेण्याबाबत त्यांच्यावर दबाव वाढेल. नोकरीत गोंधळ आणि तणाव वाढेल. जोडीदाराच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. कौटुंबिक जीवनात तणाव वाढेल.

सिंह 

ज्योतिष शास्त्रानुसार या 3 ग्रहांच्या वक्री चालीचा सिंह राशीवर विपरीत परिणाम होईल. मेहनतीनुसार फळ न मिळाल्याने निराशा राहील. नोकरीतून मन भरकटेल. त्याचबरोबर नवीन नोकरीसाठी मनात उलथापालथ होईल. या दरम्यान तुम्ही कुठेही जाल तरी तुम्हाला मानसिक शांती मिळणार नाही. अशा परिस्थितीत नीट विचार करुन मोठा निर्णय घ्या. व्यावसायिकांचे पैसे अडकू शकतात. कोणत्याही कायदेशीर बाबीमध्ये तणाव राहील. या काळात तुम्ही जोखमीचे काम करणे टाळावे. 

वृश्चिक

या राशीच्या लोकांसाठी येणारे सहा महिने खूप जड जाणार आहेत, असे ज्योतिष शास्त्रानुसार सांगण्यात येत आहे. शनी राहू आणि केतू कौटुंबिक बाबतीत तसेच करियर आणि आर्थिक बाबतीत अडचणी निर्माण करतील. आरोग्याची अत्यंत काळजी घेण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत आरोग्याबाबत थोडी निष्काळजीपणा तुमच्यासाठी समस्या निर्माण करु शकतो. व्यावसायिकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. भागीदारीत काम करणाऱ्या लोकांमध्ये मतभेद होऊ शकतात. यावेळी कागदपत्रांशिवाय आर्थिक व्यवहार करु नका.  

मीन

मीन राशीच्या लोकांना साडेसाती आहे.  या राशींचे लोक सध्या साडेसातीच्या पहिल्या फेरीतून जात आहेत. अशा स्थितीत तीन ग्रहांचे प्रतिगामी संक्रमण मीन राशीच्या लोकांसाठी मानसिक आणि आर्थिक समस्या निर्माण करेल. मनात एखाद्या गोष्टीबद्दल गोंधळ होऊ शकतो. जोडीदाराशी वाद आणि समन्वयाचा अभाव यामुळे घरातील वातावरण अशांत होईल. आरोग्याशी संबंधित समस्यांवर अधिक पैसे खर्च होतील. जुन्या समस्या पुन्हा उद्भवू शकतात. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)