Buddha Purnima 2024 : वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षात पौर्णिमा तिथी ही बुद्ध पौर्णिमा म्हणून ओखळली जाते. यादिवशी गौतम बुद्ध यांची जयंती साजरी करण्यात येते. हा दिवस बौद्ध समाजासाठी खूप खास असतो. या दिवशी स्नान आणि दान करण्यासोबतच चंद्रदेव आणि लक्ष्मीची पूजा केल्यास विशेष लाभ मिळतात अशी मान्यता आहे. बुद्ध पौर्णिमा 23 मे, गुरुवारी साजरी करण्यात येणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार हा दिवस अतिशय खास आहे. कारण या दिवशी गजलक्ष्मी, गुरु आदित्य, शुक्रादित्य आणि शिव योग असणार आहे. त्यामुळे बुद्ध पौर्णिमेला निर्माण झालेला अद्भूत योग काही राशींना लाभदायक ठरणार आहे.
बौद्ध पौर्णिमेला या राशीच्या लोकांवर देवी लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. या राशीच्या लोकांना आर्थिक लाभासोबतच प्रत्येक क्षेत्रात यश मिळणार आहे. नशिबाने पूर्ण साथ मिळणार असल्याने रखडलेली कामं पुन्हा सुरू होणार आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ व्यतित करणार आहे. नोकरदार लोकांना बरेच फायदे मिळणार आहे. तुमच्या कामाचा विचार करता तुमच्यावर काही मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे. भविष्यासाठी बचत करण्यातही तुम्ही यशस्वी होणार असून तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळणार आहे.
बौद्ध पौर्णिमा सिंह राशीच्या लोकांसाठी खूप शुभ असणार आहे. या राशीच्या लोकांची दीर्घकाळ प्रलंबित कामं पूर्ण होणार आहे. तुमच्या संपत्तीत वाढ होणार आहे. माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्ही धनसंचय करण्यात यशस्वी होणार आहात. वाहन, मालमत्ता किंवा प्लॉट खरेदीचे योग आहेत. नोकरदारांनाही खूप फायदा होणार आहे. तुम्हाला दीर्घकाळ प्रलंबित असलेला स्टॉक, करार किंवा प्रकल्प मिळणार आहे. अशा स्थितीत भविष्यात तुम्हाला याचा भरपूर फायदा मिळणार आहे.
तूळ राशीच्या लोकांसाठी बौद्ध पौर्णिमा असलेले गजलक्ष्मी आणि इतर राजयोग खूप फायदेशीर ठरणार आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या व्यक्तीच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडणार आहे. बेरोजगारांना चांगली नोकरी मिळणार आहे. यासोबतच नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांनाही बरेच फायदे मिळणार आहेत. तुमच्या कामाचा विचार केल्यास तुम्हाला वाढ, बोनस मिळणार आहे. उच्च अधिकाऱ्यांशी चांगले संबंध असल्यामुळे तुमच्यावर काही मोठी जबाबदारी सोपवली जाणार आहे. रखडलेली कामे पुन्हा मार्गी लागणार आहे. माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)