Bhutadi Amavasya 2023 : घरात पितृदोषाची अशी लक्षणं जाणवतात का? भौमवती अमावस्येला करा 'हे' उपाय

Bhutadi Amavasya 2023 : फाल्गुन महिन्यातील शेवटची अमावस्या म्हणजे चैत्र अमावस्या (Chaitra Amavasya 2023)...यात अमावस्याला भूताडी तर कुठे भौमवती अमावस्या (Bhaumvati Amavasya) म्हणूनही ओळखलं जातं. तुमच्या घरात पितृदोषाची लक्षणं जाणवत असेल तर या अमावस्याला ज्योतिषशास्त्रात सांगितलेले उपाय करा. 

Updated: Mar 21, 2023, 06:19 AM IST
Bhutadi Amavasya 2023 : घरात पितृदोषाची अशी लक्षणं जाणवतात का? भौमवती अमावस्येला करा 'हे' उपाय  title=
Bhaumvati Amavasya Bhutadi Amavasya or Chaitra Amavasya 2023 sings of pitra dosh and Pitra Dosh Upay in marathi

Bhaumvati Amavasya Pitra Dosh Upay in marathi : गुढीपाडव्याच्या (Gudipadwa 2023) एक दिवस आधी अमावस्या येणार आहे. हिंदू धर्मात अमावस्या आणि पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या वर्षातील पहिली भौमवती अमावस्या येत्या 21 मार्च 2023 म्हणजे मंगळवारी (Bhutadi Amavasya 2023 Date) आहे. यादिवशी स्नान आणि दानाला विशेष महत्त्व आहे. या अमावस्याला काही ठिकाणी भूताडी अमावस्या (Bhutadi Amavasya) म्हणून पण ओळखलं जातं.  तर काही जण याला चैत्र अमावस्या (Chaitra Amavasya 2023) असंही म्हणतं. असं म्हणतात या दिवशी अतृप्त आत्मा अधिक सक्रिय असतात. (Astrology News in marathi)

पूर्वज शांत समाधानी असतील तर कुटुंब आनंदात आणि सुखात नांदतं. पण घरात तुमच्या पितृदोषचे लक्षणं दिसत असतील तर मंगळवारची अमावस्या हे विघ्न दूर करण्यासाठी उत्तम आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जर चैत्र अमावस्याला काही उपाय केल्यास पितृदोष नाहीसे होतात. त्यामुळे घरातील नकारात्मक शक्तींचा प्रभाव कमी करण्यासाठी कुठले उपाय करायचे आहेत ते पाहूयात...(Bhaumvati Amavasya Bhutadi Amavasya or Chaitra Amavasya 2023 sings of pitra dosh and Pitra Dosh Upay in marathi )

भौमवती अमावस्या शुभ योग  (Bhutadi Amavasya 2023 date, Puja Vudhi and Subha Yog)

21 मार्च 2023  मंगळवारी - सकाळी 12:42 

सर्वार्थ सिद्धी योग - 21 मार्च 2023  मंगळवारी संध्याकाळी 05:25 पासून बुधवारी पहाटेपर्यंत

आधी पितृदोषाचे संकेत जाणून घेऊयात (sings of pitra dosh)

कुटुंबातील प्रत्येक कामात अडचणी येणे

संततीप्राप्तीमध्ये अडचण 

कुटुंबात सुख शांती नसते

कुटुंबात सतत वादविवाद होतात

घरात एकामागून एक सदस्य आजारी पडत असतात

शुभ कार्य किंवा विवाहमध्ये अडचणी येणे

नोकरी आणि व्यवसायात अडचणी येणे

आर्थिक स्थिती चांगली नसणे

पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी करा 'हे' उपाय (pitra dosh upay)

सकाळी स्नान करुन पूर्वजांसाठी तर्पण आणि पिंडदान करा. 

आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करा

आंघोळीनंतर पूर्वजांना जल अर्पण करा. 

गरीबांना दानधर्म करा, त्यांना अन्नदान करा.

कावळे, गाय आणि पक्ष्यांना अन्नदान करा

ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी गाईचं दान केल्यास पितृदोषापासून मुक्ती मिळते असं म्हणतात. 

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)