Weekly Love Horoscope 20 March to 26 March 2023 in marathi : भूताडी अमावस्या (Bhutadi Amavasya 2023) , गुढीपाडवा (Gudi Padwa 2023), चैत्र नवरात्री (Chaitra Navratri 2023), अक्कोलकोट स्वामी समर्थ प्रकटदिन (SWAMI SAMARTH PRAKAT DIN), रमजानला सुरुवात (Ramadan 2023) आणि विनायक चर्तुथी (Vinayaka Chaturthi 2023)...या आठवड्यात प्रत्येक दिवशी काही ना काही आहे. त्यात ग्रह गोचरमुळे अनेक शुभ योग तयार होतं आहे. गजकेसरी राजयोग (Gajkesari Rajyog 2023) आणि पंचग्रही योगामुळे (Panchagrahi Yoga) काही राशींचं नशिब चमकणार आहे. गुरु, बुध, सूर्य, चंद्र आणि नेपच्यूनचा मीन राशीत पंचग्रही योग तयार होतं आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्या लव्ह लाइफ आणि कुटुंबासाठी कसा असणार आहे ते जाणून घेऊयात. (weekly love horoscope 20 March to 26 March 2023 weekly love rashifal all zodiac sign very romanticin Panchagrahi Yoga in marathi)
हा आठवडा या राशीच्या लोकांसाठी खूप आनंदायी असणार आहे. त्याचा प्रेम जीवनात सुख येणार आहे. संवाद, एकमेकांना वेळ त्यामुळे प्रेम संबंध घट्ट होणार आहे. या आठवड्यात तुमच्या लव्ह लाइफमध्ये शुभ योग जुळून येणार आहे, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
या राशीच्या लव्ह लाइफमध्ये या आठवड्यात प्रेमच प्रेम असणार आहे. रोमान्स वाढणार असल्याने तुम्ही सुंदर नात्याचा अनुभव घेणार आहे. तुमच्या लव्ह लाइफमध्ये पंचग्रह योगामुळे अनेक बदल दिसून येणार आहे, असं ज्योतिषाशास्त्रात सांगण्यात आलं आहे. कुटुंबातही आनंदाचं वातावरण असणार आहे.
हा आठवड्या या राशीच्या लोकांसाठी आनंदच आनंद घेऊन आला आहे. तुमच्या जीवनातील स्त्रीमुळे तुमच्या आयुष्यात चांगले बदल घडणार आहेत. त्यामुळे जीवनात आनंद आणि शांतीचा अनुभव तुम्ही घेणार आहात. कुटुंबातही आनंद असल्यामुळे तुमच्या पार्टी करण्याचा मूड होणार आहे.
या राशीच्या लोकांचं लव्ह लाइफ खूप सुंदर असणार आहे. सुख समृद्धी असं दुहेरी क्षणाचा आनंद हे घेणार आहेत. तुमचं प्रेमसंबंध मजबूत होणार आहे. एखाद्या जवळच्या खास व्यक्तीचा सल्ला तुमच्या लव्ह लाइफसाठी लकी ठरणार आहे. एकंदरीतच हा आठवडा तुमच्यासाठी शुभ असणार आहे.
या आठवड्यात तुमच्या आयुष्यात प्रेम आणि प्रेमच राहणार आहे. थोडा चढ उतार असणार आहे. पण शेवटी लव्ह लाइफमध्ये रोमान्स असणार आहे. जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाण्याचा विचार तुम्ही करणार आहात.
हा आठवडा तुम्हाला जरा अवस्थ वाटेल. लव्ह लाइफमध्ये थोड्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे मन विचलित आणि भावूक होणार आहे. पण आठवड्याच्या शेवटी आनंद आणि परस्पर प्रेम वाढवणारा हा आठवडा ठरणार आहे.
हा आठवडा या लोकांसाठी आनंद घेऊन आला आहे. रोमान्सने भरलेला हा आठवडा तुम्हाला प्रेमात अनेक सुखद अनुभव देणारा आहे. जोडीदाराबरोबर बाहेर फिरायला जाणार आहात. त्यामुळे तुमच्या नात्यामध्ये अजून मजबूती मिळणार आहे. तुमचं प्रेम जीवन रोमँटिक राहणार आहे.
या आठवड्या तुमच्या प्रेमाची परीक्षा असणारा ठरणार आहे. प्रेमात काही समस्या जाणवणार आहे त्यामुळे तुम्हाला मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. संयम आणि संवाद या दोन्ही गोष्टीमुळे नात टिकवून राहिल. जीवनात कायम सकारात्मक विचार ठेवून पुढे जा.
या राशीच्या लोकांच्या प्रेम जीवनात मतभेद होणार आहे. पण सुसंवाद, विश्वास, जरा वेळ आणि समजुतदारपणा ठेवल्यास नातं मजबूत होईल. या कठीण काळातील तुमच्या नात्यातील परस्पर प्रेम अधिक घट्ट होईल. आठवड्याचा शेवटी लव्ह लाइफमध्ये आनंद असेल.
हा आठवडा म्हणजे तुमच्या प्रेमाची परीक्षा असणार आहे. प्रेमात निष्काळजीपणा दाखवल्यामुळे जरा नात्यामध्ये कटुता येईल. पण शेवटी सगळं ठिक होणार आहे. आठवड्याच्या शेवटी मनं जरा हळव होणार आहे.
या राशीच्या लोकांचं लव्ह लाइफ रोमान्सने भरलेलं राहणार आहे. पण विनाकारण काळजी करु नका. या आठवड्यातील रोमान्सचा पूरेपूर आनंद घ्या. आपल्या नात्यामध्ये बाहेरील व्यक्तीचा हस्तक्षेप होऊ देऊ नका.
या राशीच्या लोकांसाठी पंचग्रह योग आनंद घेऊन आला आहे. परस्पर प्रेम अजून तुमचं नात मजबूत करणार आहे. काही अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. पण आठवड्याच्या शेवटी लव्ह लाइफमध्ये रोमान्स असणार आहे.
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)