Baba Vanga Predictions : बाबा वेंगा यांचं भारताबाबत भीतीदायक भाकीत; ते खरे ठरलं तर...

Baba Vanga Predictions : बाबा वेंगा यांनी 2022 मध्ये जगात भयानक नैसर्गिक आपत्ती (natural disaster) येण्याची शक्यता वर्तवली होती.

Updated: Sep 25, 2022, 10:50 AM IST
Baba Vanga Predictions : बाबा वेंगा यांचं भारताबाबत भीतीदायक भाकीत; ते खरे ठरलं तर... title=
baba vanga most dangerous prediction for india 2022 in marathi NM

Baba Vanga on India : अचूक भविष्यवाणीसाठी प्रसिद्ध असलेल्या बाबा वेंगा (Baba Vanga) यांनी पुन्हा एक भाकीत केलं आहे. बाबा वेंगाच्या या भविष्यवाणीमुळे (Predictions) भारतीयांची (India) चिंता वाढली आहे. खरं तर हे वर्ष संपायला अवघे तीन महिने बाकी आहे. अशात जर बाबा वेंगा यांचं भाकीत खरं ठरलं तर भारतीयांवर महासंकटाचे काळे ढग घोंगावतायेत. 

बाबा वेंगा यांची भविष्यवाणी खरी ठरली तर, भारतात दुष्काळासारखी परिस्थिती (Drought-like situation in India) निर्माण होऊ शकते. बाबा वेंगा यांनी केलेली अनेक भाकितं आजवर खरी ठरली आहेत. अशा परिस्थितीत ही मोठी चिंतेची बाब आहे.

बाबा वेंगा यांनी 2022 च्या त्यांच्या भविष्यवाणीत म्हटलं होतं की, ऑस्ट्रेलियामध्ये पूर (Australia) आल्यासारखी परिस्थिती निर्माण होईल, मोठ्या प्रमाणावर ऑस्ट्रेलियातील लोकांना अनेक गोष्टींचा फटका बसेल. तर दुसऱ्या भविष्यवाणीत त्यांनी जगातील अनेक शहरांमध्ये दुष्काळ आणि पाण्याचं संकट अधिक गडद होईल, असं म्हटलं होतं. (baba vanga most dangerous prediction for india 2022 in marathi NM)

बाबा वेंगा यांनी 2022 मध्ये जगात भयानक नैसर्गिक आपत्ती (natural disaster) येण्याची शक्यता वर्तवली होती. भूकंप (Earthquake) आणि सुनामी (Tsunami) येण्याची शक्यता आहे. आशियाई देशांना (Asian countries) भीषण पुराचा सामना करावा लागणार आहे. महत्त्वाचे म्हणजे पाकिस्तानमध्ये (Pakistan) आलेल्या महापुरामुळे तिथं जनजीवन विस्कळीत झालं आहे. याशिवाय त्सुनामीमुळे शेकडो लोकांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. बाबा वेंगा यांनी सायबेरियात (Siberia) एक धोकादायक जन्म घेण्याचा अंदाज वर्तवला आहे.

भारतासाठी चिंतेची बाब...

'द सन'मध्ये (The Sun) प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, या वर्षी जगातील तापमानात घट होणार असून, त्यामुळे टोळांचा प्रादुर्भाव वाढणार आहे. असं झाल्यास, हिरवळ आणि अन्नाच्या शोधात टोळ किटकांचा (Locust insect) गट भारतावर धाड मारेल. त्यामुळे देशातील धान्यसाठ्यावर परिणाम होईल आणि दुष्काळ पडले. 

मात्र, सोशल मीडियावरील लोकांचा असाही विश्वास आहे की, बाबांचे अनेक भाकीत यापूर्वीही चुकीचे ठरले आहेत, त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. भविष्यात काय होईल हे कोणालाच माहिती नसतं, बाबा वेंगाची ही भीतीदायक आणि धोकादायक भविष्यवाणीमुळे लाखो लोकांना दोन वेळचे जेवण घेण्यास अडचण येणार आहे. या भविष्यवाणीवर तज्ज्ञांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहे. मात्र, बाबा वेंगांची ही भविष्यवाणी खरी ठरते की नाही हे येणारा काळच सांगेल.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)