राशीभविष्य | या राशीच्या व्यक्तींना होईल गुंतवणुकीचा फायदा

असा असेल तुमचा आजचा दिवस

Updated: Oct 6, 2020, 07:26 AM IST
राशीभविष्य | या राशीच्या व्यक्तींना होईल गुंतवणुकीचा फायदा title=

मेष - तुम्ही जर कोणत्या निकालाची वाट पाहत असाल थोडा धीर धरा. रोजच्या कामापेक्षा काहीतरी वेगळ करण्याचा प्रयत्न कराल. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिवस शुभ आहे. अधिकाऱ्यांची मदत मिळेल. नोकरी, व्यवसायासाठी दिवस चांगला. रखडलेले पैसे मिळतील. कामात घाई करु नका. काही गोष्टींबद्दल काळजी वाटेल. 

वृषभ - गुंतवणूक करताना सावध राहा. धनहानी होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. वायफळ खर्च करु नका. अधिक मेहनत घ्यावी लागेल. जवळची व्यक्ती तुमचा चुकीचा फायदा घेऊ शकते. तब्येतीची काळजी घ्या. 

मिथुन - कामाच्या ठिकाणी समस्या वाढू शकतात. व्यवसायात कामं अपूर्ण राहतील. अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळणार नाही. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना विचार करा. इतरांसोबत संबंध तणावपूर्ण राहतील. 

कर्क - एकाच वेळी अनेक कामं हाती घेऊ नका. समस्या वाढू शकतात. कामात मन न लागल्याने कामात अडचणी येऊ शकतात. अनेक लोक तुमच्या संपर्कात राहतील. अनेक गोष्टींसाठी तुम्हाला सूचना मिळू शकतात. अंगदुखी, डोकेदुखी होऊ शकते. 

सिंह - व्यवसायात फायदा होईल. गुंतवणूकीत फायदा होऊ शकतो. अविवाहितांसाठी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. दिवस चांगला आहे. करियरमध्ये पुढे जाण्यासाठी चांगल्या संधी मिळू शकतात. मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. स्वत:च्या कामावर संतृष्ट नसाल. जरुरी चेकअप करुन घ्या. 

कन्या - कोणतंही जोखमीचं काम करु नका. वाद होण्याची शक्यता आहे. जुन्या गोष्टींमुळे समस्या वाढू शकतात. बोलताना विचार करुन बोला. अधिक काम केल्याने थकवा जाणवेल. घाईत काम करु नका. तब्येतीत सुधारणा होईल.

तुळ - आर्थिक गोष्टींसाठी दिवस अनुकूल आहे. पती-पत्नीमधील गैरसमज दूर होतील. वैवाहिक जीवन सुखी राहील. विद्यार्थ्यांसाठी दिवस काही प्रमाणात नकारात्मक राहील. कामं पूर्ण करण्यासाठी मदत मिळू शकते. तब्येतीची काळजी घ्या.

वृश्चिक - विद्यार्थ्यांना मेहनतीने अधिक चांगले परिणाम मिळतील. कुटुंबातील लोकांशी संबंध सुधारण्यास मदत होईल. महत्त्वाची कामं पूर्ण होतील. नवीन काम सुरु करण्याचा प्रयत्न करु शकता. कोणत्याही गोष्टी अधिक ताणू नका. तब्येत ठिक राहील.

धनु - नोकरदारवर्गासाठी दिवस अनुकूल आहे. बढतीची शक्यता आहे. ऑफिसमध्ये एखादे मोठे काम मिळू शकते. त्यात यशस्वी व्हाल. बिघडलेली परिस्थिती बदलण्यात यशस्वी व्हाल. जवळची व्यक्ती तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. प्रेमसंबंधांसाठी दिवस ठिक आहे.

मकर - उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी मदत मिळेल. जोडीदारासोबत वेळ काढाल. फिरण्याचा प्लान होऊ शकतो. नोकरदारवर्गाला नवीन काम मिळू शकते. पोटासंबंधी आजार होऊ शकतो. 

कुंभ - व्यवसायात वादाची परिस्थिती येऊ शकते. मेहनत वाढेल. छोट्या-छोट्या गोष्टींवर निराश होऊ शकता. कामासाठी वेळ लागेल. पैशांच्या बाबतीत मोठा निर्णय एकट्याने घेऊ नका. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. तुमचे विचार योग्यरित्या मांडता येणार नाहीत. तब्येत ठिक राहील. 

मीन - व्यवसायासाठी दिवस चांगला आहे. गुंतवणूकीसाठी दिवस चांगला आहे. विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळेल. जोडीदारासोबत फिरण्याची योजना आखू शकता. प्रेमसंबंधांसाठी दिवस चांगला आहे. डोकेदुखी होऊ शकते. मतभेद होऊ शकतात. शांत राहाल तर फायदा होईल.