राशीभविष्य | 'या' राशीच्या व्यक्ती नोकरीपेक्षा व्यवसायात संतुष्ट

असा असेल तुमचा आजचा दिवस

Updated: Mar 24, 2021, 07:22 AM IST
राशीभविष्य | 'या' राशीच्या व्यक्ती नोकरीपेक्षा व्यवसायात संतुष्ट title=

मेष- आज तुमचं व्यक्तीमत्व आकर्षक राहील. घर, जमीनीबद्दल काही नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये अर्धे राहीलेले काम पूर्ण कराल. मनात आलेल्या शंकांचे निराकरण होईल. 

वृषभ- मेहनतीचे फळ चांगले असेल, विचार केलेली कामे लवकर पूर्ण होतील. येणाऱ्या चांगल्या दिवसांसाठी बेत आखू शकाल. खास व्यक्तीसह मनातल्या गोष्टी शेअर कराल. 

मिथुन- गोंधळात अडकलेल्या परिस्थितीतून चांगला मार्ग निघण्याची शक्यता आहे. धैर्य ठेवा त्याचप्रमाणे प्रयत्न चालू ठेवा. धनलाभ हेण्याची शक्यता आहे. चांगली बातमी मिळेल.

कर्क- करिअरच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. नोकरीच्या ठिकाणी असणाऱ्यांना इतरांची मदत मिळेल. काही चांगले आणि महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी आणि व्यापारामध्ये इतरांचा सल्ला मिळेल. धनलाब होण्यची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. 

सिंह - नोकरीच्या ठिकाणी तुम्ही काहीजणांवर प्रभाव पाडण्यात यशस्वी ठराल. नोकरी बदलण्याच्या किंवा जास्त कमाई करण्याच्या मार्गांचा विचार करु शकता. यामध्ये तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. काही बाबतीत अचानक फायदा मिळेल. 

कन्या- वरिष्ठांचं सहकार्य तसं कमीच मिळेल. व्यवसायात सावध राहा. जी कामं हाती घ्याल त्यात यश मिळेलच असं नाही. व्यापाराच्या निर्णयांमध्ये कोणाचा सल्ला घ्या. एकटेपणापासून दूर राहा. साथीदारासोबत एखादा प्रवास घडू शकतो. 

तुळ- अविवाहीत लोकांसाठी दिवस चांगला आहे. विवाहीत लोकांना जीवनसाथीकडून मदत मिळेल. कामाच्या ठिकाणी काही लोकांकडून मदत मिळेल. चांगली बातमी मिळेल. कामात व्यस्त राहाल. 

वृश्चिक- मनात चांगले विचार येतील. विश्वासातील लोकांकडून सल्ला घ्या. त्यांच्याकडून मदत मिळण्याची शक्यता आहे. प्रतिभा सिद्ध करण्यात यशस्वी रहाल. नविन शिकण्यात रस राहील. स्वत:वर संयम ठेवा. विचार केलेली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

धनु- अडचणींमधून मुक्त व्हाल. नवीन तंत्रज्ञानामुळे तुमचे काम सुखकर हेईल. नवीन वस्तू विक्री करण्याचे योग आहेत. व्यवसायात कुटुंबाकडून मदत मिळेल. नवीन कामाची सुरुवात करू शकता. प्रेमात यश मिळेल.  

मकर- जुन्या अडचणी दूर होतील. परिस्थिती अनुकूल असेल. अडकलेली कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. व्यापार आणि नोकरीच्या बाबतीत काही नव्या कल्पना मिळतील. उत्साह वाढेल. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. साथीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे.    

कुंभ- नोकरीपेक्षा व्यवसाय करणारे लोक जास्त संतुष्ट राहतील. इतरांना मदत करण्याची संधी मिळेल. अपत्यांकडून सुख मिळेल. कामात यश मिळेल. वरिष्टांकडून कामाचे कैतुक होईल. 

मीन- धनलाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. काही प्रसंगी अचानक फायदा होण्याची शक्यता आहे. अत्मविश्वास वाढेल. आजुबाजूचे लोक तुमचं कैतुक करतील.