मुंबई: जिद्दी असणं आणि कोणाचंही न ऐकणं यामध्ये काही लोक खूप माहीर असतात. असे हट्टी आणि आपल्या मर्जीनुसार खरं करणारी लोक आपल्याला आपल्या आजूबाजूलाही दिसतात. त्यांच्यात वेगवेगळ्या क्वालिटी असतात. स्वभाव वेगळा असला तरी आपल्या मर्जीने राहाणे 5 राशीच्या लोकांना खूप आवडते. यामध्ये कोणत्या राशी आहेत जाणून घेऊया.
मेष : या राशीच्या लोकांना मनवणं खूप कठीण असतं. ते कोणाचंही ऐकत नाहीत. ते आपला रस्ता स्वत: निवडतात. ते इतरांच्या सल्ल्यासाठी थांबून राहात नाहीत. एकट्याने कोणत्याही निर्णयात पुढे जाण्याची तयारी असते. ते आपल्या निर्णयापासून मागे फिरत नाहीत.
मिथुन : या राशीच्या लोकांच्या मनाचा ठाव कधीच लागत नाही. ते आपल्या गोष्टी लपवण्यात माहीर असतात. ते एकदा घेतलेला निर्णय सहसा बदलत नाहीत. ते आपला निर्णय न बदलण्यावर बऱ्याचदा ठाम असतात. त्यांना चमचेगिरी करायला आवडते. त्यांचा स्वभाव थोडा वेगळा असतो. जो पटकन समजत नाही.
वृश्चिक : या राशीच्या लोक आपल्या मर्जीचे मालक असतात. ते सगळ्या गोष्टी दुसऱ्याकडून वधवून घेण्यात माहीर असतात. या लोकांच्या मनात काय आहे ते कधीही कळणार नाही. त्यांना मूर्ख बनवणे, त्यांना कामावर आणणे किंवा त्यांचे म्हणणे मांडणे जवळजवळ अशक्य आहे.
धनु : या राशीचे लोक इमानदार, मेहनती आणि चांगल्या स्वभावाचे असतात. ते मनाने खूप खंबीर असतात. त्यामुळे त्यांच्याकडून एखादी गोष्ट मनवून घेणं खूप कठीण असतं. ते ऐकून घेतील मात्र आपल्या निर्णयापासून मागे फिरणं कठीण असतं.
मकर : या राशीच्या लोकांवर शनीचा प्रभाव असतो. जे ते ठरवतात ते पूर्ण केल्याशिवाय शांत बसत नाहीत. ते दुसऱ्याचा मनाचा विचार करत नाहीत. आपल्या मर्जीचे राजे असतात. लोक काय म्हणतील याचा विचार ते करत नाहीत.
(Disclaimer: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे. अधिक माहिती आहे बातम्यांसाठी फॉलो करा 24 Tass.com )