कांदा भजी खाण्याचा आज शेवटचा दिवस! काय असते कांदे नवमी? जाणून घ्या धर्मशास्त्र आणि वैज्ञानिक कारण!

Kanda Navami : पंचांगानुसार आषाढी एकादशीपूर्वी येणाऱ्या नवमीला कांदा नवमी असं म्हटलं जातं. यादिवशी कांदा भजी खाण्याचा शेवटचा दिवस मानला जातो. कारण यानंतर चार महिने कांदा भजी खाता येणार नाहीत. 

नेहा चौधरी | Updated: Jul 15, 2024, 03:00 PM IST
कांदा भजी खाण्याचा आज शेवटचा दिवस! काय असते कांदे नवमी? जाणून घ्या धर्मशास्त्र आणि वैज्ञानिक कारण! title=
ashadhi ekadashi 2024 Today is the last day to eat Kanda Bhaji What is Kande Navami Learn theology and science

Kande Navami : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सर्वत्र मस्त पाऊस पडतोय. अशात गरमा गरम चहासोबत कांदा भजी खाण्याची मजाच काही और असते. तुम्हाला पण कांदा भजी खाण्याची इच्छा झाली असेल तर आजच बेत करा. कारण उद्यापासून तुम्हाला कांदा भजी खाता येणार नाही. आज हिंदू पंचांगानुसार आषाढ शुद्ध नवमी तिथी आहे. या नवमीला कांदा नवमी असं म्हटलं जातं. आजपासून पुढील चार महिने कार्तिक एकादशीपर्यंत कांदा भजी खाणे वर्ज्य असतं. खरं तर कांदे, वांगे आणि लसूण आजपासून चार महिने खात नाहीत. या पुढील चार महिन्याला चातुर्मास असं म्हटलं जातं. उद्यापासून असंख्य घरांमध्ये कार्तिकी पौर्णिमेपर्यंत कांदा, लसूण आणि वांगे खालली जात नाही. (ashadhi ekadashi 2024 Today is the last day to eat Kanda Bhaji What is Kande Navami Learn theology and science)

काय असते कांदे नवमी? जाणून घ्या धर्मशास्त्र आणि वैज्ञानिक कारण

हिंदू धर्मात धार्मिक कार्यात देवाला नैवेद्य दाखवताना त्या पदार्थांमध्ये कांदा लसूण वापरण्यावर बंदी असते. देवाच्या नैवेद्यात कांदा लसूण असल्यास देव नाराज होतात, अशी मान्यता आहे. चातुर्मासात चार महिने आषाढ एकादशीपासून अनेक सण व्रत सुरु होतात.

हेसुद्धा वाचा - बेसनाशिवाय बनवा कुरकुरीत भजी; 'ही' रेसिपी एकदा ट्राय कराच!

त्यामुळे पुढील चार महिने कांदा लसूण खाला जात नाही. त्यामुळे नवमी तिथीला कांदा नवमी म्हटलं जातं. तरदुसरीकडे अशा वेळी घरात कांदे भरून ठेवले तर पावसाळी वातावरणात ते कुजून खराब होतात आणि घरात दुर्गंध पसरते. म्हणून नवमी तिथीला कांदाचे पदार्थ केले जातात. जेणेकरुन घरातील कांदा संपून जाईल. 

हेसुद्धा वाचा - Ashadhi Ekadashi 2024 : आषाढी एकादशीला 'देवशयनी' एकादशी का म्हणतात? चातुर्मास म्हणजे काय?

तर वैज्ञानिकदृष्टीकोनातून असं म्हटलं जात की कांदाला कोंब फुटल्यास असा कांदा खाल्ल्यास मनोव्यापार चाळवणारा ठरतो. म्हणून कांद्याला कंदर्प म्हणजे मदन असं म्हटल जातं. कांद्याचे सेवन केल्यास त्याचा परिणाम रक्तात असेपर्यंत कामवासनात्मक विचार मनात येतात असं तज्ज्ञ सांगतात. कांदा खाल्यावर काही वेळाने वीर्याची घनता कमी होते आणि गतीमानता वाढते. त्या शिवाय पावसाळ्यात कांदा खाल्यास अपचन, अजीर्णसारखे उदरविकार होतात. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)