Jupiter Earth Connection Impact: ग्रहांच्या गोचराला ज्योतिषशास्त्रात विशेष महत्त्व आहे. पण नुसत्या गोचरासोबत ग्रह पृथीपासून किती दूर आणि किती अंशात आहे याकडे पाहिलं जातं. सोमवार, 26 सप्टेंबर रोजी गुरु ग्रह पृथ्वीच्या अगदी जवळ येणार आहे. गेल्या 60 वर्षांत प्रथमच असं घडत आहेत. याआधी हे दोन ग्रह 1963 मध्ये खूप जवळ आले होते. गुरू (Jupiter) आणि पृथ्वी (Earth) जवळ आल्याचे दृश्य आकाशात पाहायला मिळते. चला जाणून घेऊया की ज्योतिष शास्त्रानुसार या घटनेचा मानव आणि पृथ्वीवर काय परिणाम होईल.
ज्योतिष शास्त्रानुसार गुरू ग्रह पृथ्वीच्या इतक्या जवळ आल्याने त्याचा प्रभाव सर्वांवर असेल. त्याचा प्रभाव हवामानावर अधिक दिसून येईल. दक्षिण भारत, बिहार, बंगाल या राज्यांमध्ये परतीचा पाऊस चांगला होऊ शकतो. यावेळी देवी दुर्गा हत्तीवर स्वार होऊन येत आहे. त्याचबरोबर हे गुरूचे वाहनही मानले जाते. अशा स्थितीत यंदा नोव्हेंबरमध्ये चांगला पाऊस होण्याची चिन्हे आहेत. या स्थितीमुळे लोकांमध्ये धार्मिक भावना निर्माण होईल. दुसरीकडे सूर्यग्रहणापूर्वी सोन्याच्या किमतीत मोठी घसरण होणार असल्याचे बोलले जात आहे. सूर्यग्रहणापूर्वी शेअर बाजारात नफा होऊ शकतो.
Shani Dev Margi: फक्त काही दिवसांचा अवधी, शनिदेव मार्गी होणार असल्याने पाच राशींना होणार फायदा
25 सप्टेंबर आणि 26 सप्टेंबर रोजी ही घटना स्पष्टपणे दिसून येईल, असे सांगण्यात येत आहे. 25 सप्टेंबर म्हणजे आज गुरू आणि पृथ्वीमधील अंतर सर्वात कमी असेल. त्याच वेळी, 26 सप्टेंबर रोजी तो सूर्याच्या विरुद्ध दिशेला दिसेल. पृथ्वीच्या जवळ असल्यामुळे गुरु ग्रह मोठा आणि तेजस्वी दिसेल. जर हवामान स्वच्छ असेल आणि अंधार असेल तर, गुरू ग्रह दुर्बिणीच्या मदतीने पाहता येईल.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)