Astrology 2022: सात दिवसानंतर अशुभ योगातून होईल सुटका, तिथपर्यंत 'या' गोष्टी लक्षात ठेवा

प्रत्येक ग्रहाचा गोचर कालावधी वेगवेगळा असल्याने एकापेक्षा अधिक ग्रह एका राशीत एकत्र येतात. यामुळे काही शुभ, तर काही अशुभ योग तयार होतात.

Updated: Aug 3, 2022, 06:15 PM IST
Astrology 2022: सात दिवसानंतर अशुभ योगातून होईल सुटका, तिथपर्यंत 'या' गोष्टी लक्षात ठेवा title=

Angarak Yog In Aries: ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या गोचर आणि युतील खूप महत्त्व आहे. प्रत्येक ग्रहाचा गोचर कालावधी वेगवेगळा असल्याने एकापेक्षा अधिक ग्रह एका राशीत एकत्र येतात. यामुळे काही शुभ, तर काही अशुभ योग तयार होतात. गोचर कुंडलीनुसार 27 जुलैला मंगळ ग्रहाने मेष राशीत प्रवेश केला आहे. या राशीत आधीच दीड वर्षांसाठी राहु ग्रह विराजमान आहे. ज्योतिषशास्त्रात राहु पाप ग्रह असून मंगळ ग्रहाला उग्र ग्रह म्हणून संबोधलं आहे. त्यामुळे एकाच राशीत राहु आणि मंगळ ग्रह एकत्र आल्याने अंगारक योग तयार झाला आहे. ही युती 10 ऑगस्टपर्यंत असणार आहे. म्हणजेच मेष राशीच्या जातकांची सात दिवसांनंतर सुटका होईल. 10 ऑगस्टला मंगळ ग्रह मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करेल. 

अंगारक योगाचा प्रभाव

ज्योतिषशास्त्रात अंगारक योग हा अशुभ योग मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत हा योग तयार होतो, त्याच्या स्वभावात क्रूरता येते. छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद सुरू होतात. इतकेच नाही तर त्याचा परिणाम वैवाहिक जीवनावरही दिसून येतो. पती-पत्नीमधील कलह वाढू लागतो. अंगारक योगामुळे व्यक्ती चुकीचे पाऊल उचलू शकते. 10 ऑगस्टपर्यंत मेष राशीच्या लोकांनी सावध राहण्याची गरज आहे. 

- कोणाला वाईट बोलू नका.
- रागावर नियंत्रण ठेवा.
- जास्त उत्तेजित होऊ नका.
- नशा वगैरेपासून अंतर ठेवा.
- हनुमानजींची पूजा करा.
- ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा.
- गायीची सेवा केल्यास लाभ होईल.

राहू मेष राशीत गोचर

मंगळ ग्रह 10 ऑगस्ट रोजी मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करेल. परंतु 30 ऑक्टोबरपर्यंत राहू मेष राशीत असणार आहे. राहू हा शुभ ग्रह मानला जात नाही. हा पाप ग्रह मानला जातो. मेष राशीत प्रवेश केल्याने माणसाच्या आयुष्यात अचानक विचित्र घटना वाढू लागतात. अशा परिस्थितीत माणसाने मन खंबीर ठेवणं गरजेचं आहे.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)