Kendra Tirkon Rajyog: वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांच्या हालचालीने अनेक शुभ आणि अशुभ योग तयार होत असतात. हे योग जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत असतील तर त्या व्यक्तीला जीवनातील सर्व सुखं प्राप्त होतात असं मानलं जातं. ग्रह देखील वेळोवेळी संक्रमण करतात आणि शुभ योग तयार करतात. ज्याचा मानवी जीवनावर परिणाम होतो.
शनिदेवांनी स्वतःच्या राशीत कुंभ राशीत प्रवेश केला. शनी देवाच्या परिवर्तनाने केंद्र त्रिकोण राजयोग तयार झाला आहे. तर शनिदेव सध्या वक्री अवस्थेत भ्रमण करत आहेत. यामुळे या योगाचा सर्व राशींवर अधिक प्रभाव पडतोय. परंतु अशा 3 राशी आहेत ज्यांच्यासाठी यावेळी अचानक आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी हा राजयोग फायदेशीर ठरणार आहे.
उत्पन्न आणि वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने केंद्र त्रिकोण राजयोग तुमच्यासाठी शुभ सिद्ध होणार आहे. कारण शनीने तुमच्या कुंडलीच्या सातव्या भावात केंद्र त्रिकोण राजयोग तयार केला आहे. या काळात तुमचं उत्पन्न वाढू शकतं. तुम्हाला तुमच्या लाइफ पार्टनरची साथ मिळेल. नोकरदार लोकांची कामगिरी कामाच्या ठिकाणी चांगली असेल. तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात.
कुंभ राशीच्या लोकांसाठी केंद्र त्रिकोण राजयोग लाभदायक ठरू शकणार आहे. यावेळी तुमच्यामध्ये नवीन ऊर्जा संचारली जाणार आहे. तुमची बौद्धिक पातळी विकसित होण्याची शक्यता आहे. विवाहित लोकांच्या जीवनात गोडवा येणार आहे. तुमच्या मनोकामना पूर्ण होणार आहे. तुम्हाला सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल.
केंद्र त्रिकोण राजयोग तुमच्यासाठी अनुकूल ठरणार आहे. तुमच्या संक्रमण कुंडलीच्या पाचव्या भावात हा योग तयार होत आहे. तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. जर तुम्ही या काळात कोणतीही नवीन योजना सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला चांगले फायदे मिळतील. यावेळी तुम्हाला अपघाती पैसे मिळू शकतात. शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये लाभ होऊ शकतो.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )