Surya Rashi Parivartan 2022: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका निश्चित कालावधीनंतर राशी बदल करतो. शनिदेव अडीच वर्षानंतर, गुरू एका वर्षानंतर, राहु-केतू दीड वर्षानंतर आणि सूर्यदेव एका महिन्यानंतर राशी बदल करतात. एका महिन्याच्या कालावधीनंतर आता ग्रहांचा राजा सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करणार आहे. 17 ऑक्टोबरला म्हणजेच 24 तासानंतर राशीबदल होणार आहे. सूर्यदेव तूळ राशीत 16 नोव्हेबर 2022 पर्यंत राहणार आहेत. पण असं असताना 25 ऑक्टोबरला सूर्य ग्रहण होणार आहे. त्यामुळे काही राशींच्या जीवनावर परिणाम दिसून येईल. सूर्य ग्रहणाचा कालावधी सोडला तर पाच राशींवर सकारात्मक बदल दिसून येईल.
वृषभ : वृषभ राशीच्या लोकांसाठी सूर्य गोचर खूप फायदेशीर ठरणार आहे. या राशीच्या लोकांना करिअरमध्ये मोठे यश मिळेल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ शुभ ठरेल. नवीन नोकरीची संधी मिळू शकते. व्यवसायातही फायदा होईल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. अडकलेली कामं पूर्ण झाल्याने दिलासा मिळेल.
सिंह : सूर्याच्या राशीतील बदलामुळे सिंह राशीच्या लोकांना चांगले परिणाम दिसून येतील. घरातील वातावरण आनंददायी राहील. नोकरीत बढती, पगारात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. प्रत्येक कामात यश मिळेल. अचानक कुठूनही पैसा मिळू शकतो.
धनु : धनु राशीसाठी सूर्याचे संक्रमण खूप शुभ फळ देईल. पैसा, मान, पद, सर्व काही मिळेल. करिअरमध्ये प्रगती करण्याची चांगली संधी मिळेल. व्यवसायात काही करार निश्चित होऊ शकतात. अडकलेले पैसे मिळू शकतात.
Shani Sadesati: वर्ष 2023 मध्ये 'या' तीन राशी शनिच्या प्रभावातून होणार मुक्त, जाणून घ्या
मकर : सूर्याच्या स्थितीतील बदलामुळे मकर राशीच्या लोकांना करिअरमध्ये फायदा होईल. कामाच्या ठिकाणी प्रशंसा होईल, ज्यामुळे तुमची बढतीची प्रतीक्षा संपेल. धनलाभ होईल. गुंतवणुकीचे फायदेही होतील. बँक बॅलन्स वाढेल. नवीन काम सुरू करू शकता.
मीन : सूर्य गोचर मीन राशीच्या लोकांना लाभदायी ठरेल. अडकलेली कामे वेगाने पूर्ण होतील. नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल. ज्यांना व्यवसायात गुंतवणूक करायची आहे ते करू शकतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)