Rahu Budh Yuti 2024 : तब्बल 15 वर्षांनी राहू - बुध येणार जवळ! या लोकांना प्रगतीसह भरपूर पैसा

Rahu Budh Yuti 2024 :  वैदिक ज्योतिषानुसार, बुध आणि राहूचा संयोग हा काही राशींसाठी शुभ ठरणार आहे. या लोकांना करिअर किंवा व्यवसायात प्रगतीसह भरपूर पैसा मिळणार आहे. 

नेहा चौधरी | Updated: Jan 30, 2024, 09:05 AM IST
Rahu Budh Yuti 2024 : तब्बल 15 वर्षांनी राहू - बुध येणार जवळ! या लोकांना प्रगतीसह भरपूर पैसा title=
After 15 years Rahu Mercury alliance budh rahu yuti 2024 these zodiac sign people Lots of money

Rahu Budh Yuti 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 9 ग्रह आपली स्थिती एका विशिष्ट वेळी बदलत असतात. ग्रहांच गोचर किंवा संक्रमण हे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अतिशय महत्त्वाचे असतं. याचा परिणाम मानवी जीवन आणि देशावर होतो. राहू ग्रह सध्या मीन राशीत असून 7 मार्चला बुध ग्रह मीन राशीत भ्रमण करणार असल्याने मीन राशीत या दोघांचं मिलन होणार आहे. तब्बल 15 वर्षांनी बुध आणि राहू एकाच राशीत भेटणार आहे. याचा परिणाम 12 राशींवर दिसून येणार आहे. पण खास करु काही राशींसाठी बुध राहुची भेट ही भाग्यशाली ठरणार आहे. या लोकांना अमाप संपत्तीसोबत यश आणि प्रगती प्राप्त होणार आहे. (After 15 years Rahu Mercury alliance budh rahu yuti 2024 these zodiac sign people Lots of money)

कुंभ रास (Aquarius Zodiac) 

बुध आणि राहूचा संयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. कारण हा संयोग तुमच्या राशीत धन आणि वाणीच्या घरात निर्माण होणार आहे. त्यामुळे तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळणार आहे. या काळात तुम्ही व्यवसायातही मोठी कमाई करणार आहात. यावेळी तुमच्या बोलण्यात प्रभाव सर्वांवर दिसून येणार असून ज्यामुळे लोक तुमच्यावर प्रभावित होणार आहे. त्याचबरोबर व्यावसायिकांना यावेळी उसणे दिलेले पैसे परत मिळणार आहे. तसंच, जर तुमचं काम किंवा व्यवसाय शिक्षक, मीडिया, बँकिंग आणि मार्केटिंग सारख्या भाषणाशी संबंधित असेल तर हा काळ तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. 

मिथुन रास (Gemini Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी बुध आणि राहूची जोडी फायदेशीर सिद्ध होणार आहे. कारण हा योगायोग तुमच्या संक्रमण कुंडलीच्या कर्म घरात होणार आहे. त्यामुळे या काळात नोकरी आणि व्यवसायात चांगली प्रगती होणार आहे. तसंच, या काळात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अनपेक्षित यश मिळणार आहे. दुसरीकडे, जर तुम्ही व्यापारी असाल तर तुम्हाला तुमच्या व्यवसायात शुभ परिणामासोबत अपेक्षित प्रगती होणार आहे. त्याच वेळी, नोकरदार लोकांना पदोन्नतीचे संकते आहे. यावेळी तुमचे तुमच्या वडिलांसोबतचे नातं अधिक घट्ट होणार आहे. याशिवाय वडिलोपार्जित संपत्तीचा लाभही तुम्हाला मिळणार आहे. 

कर्क रास (Cancer Zodiac)   

राहु आणि बुध यांचं संयोग तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे. कारण हा संयोग तुमच्या राशीच्या नवव्या भावात निर्माण होणार आहे. त्यामुळे यावेळी नशीब तुम्हाला साथ देणार आहे. तसंच या काळात धार्मिक कार्यात तुमची आवड अधिक वाढणार आहे. या काळात तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणीतरी परदेशी सहलीला जाणार आहेत. तसंच यावेळी तुमच्या नियोजित योजना यशस्वी होणार आहेत. तसंच तुमच्या मनोकामना पूर्ण होणार आहे. नवीन काम सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल असल्याने काम कामाचा प्रारंभ करा. तर विद्यार्थ्यांना कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळणार आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)